सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

सात दिवस लोहगडावर श्रमदानातून छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंती निमित्त अभिवादन

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त लोहगड किल्ल्यावर श्रमदानातून अभिवादन करण्यात आले.

Sudarshan MH
  • Feb 25 2025 12:16PM
पुणे: ढोले पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष शिबिर चेअरमन सागर ढोले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतेच  लोहगड या ठिकाणी संपन्न झाले. या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांनी श्रमदानातून ऐतिहासिक अशा लोहगड किल्ल्याची साफसफाई केली.गावातील विविध मंदिरे, शिवस्मारक, जिल्हा परिषद शाळा ,सार्वजनिक ठिकाणी श्रमदान केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त लोहगड किल्ल्यावर श्रमदानातून अभिवादन करण्यात आले.  
 
जगद्गुरू  संत तुकोबाराय यांचे थेट वंशज ह.भ.प शिवाजी महाराज मोरे, लोहगड विसापूर विकास मंचाचे शिव दुर्ग संवर्धक सचिन टेकवडे, प्रा.महादेव वाघमारे (जुनियर मकरंद अनासपुरे), रमन बेडेकर (ऑस्ट्रेलिया), कंपनी 3 इंडिया एच. आर. हेड ब्रह्मानंद मंडल यांची व्याख्याने शिबिरामध्ये झाली विविध विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी संचालक रोनक ढोले पाटील ,प्राचार्य डॉ. ओमप्रकाश राजनकर उपस्थित होते. समारोप समारंभात श्यामसुंदर माडेवार या मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. 
 
या शिबिरासाठी चेअरमन सागर ढोले पाटील सर यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविले.राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी समाजात शेवटच्या घटकांपर्यंत पोहचून सामाजिक काम केले पाहिजे असे मत सागर ढोले पाटील यांनी व्यक्त केले व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. 
 
सांस्कृतिक कार्यक्रम विविध सामाजिक विषयावर विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केली. शिबिराचे आयोजन चेअरमन सागर ढोले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम अधिकारी प्रा.श्रीकांत जगताप व विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.प्रशांत नकाते यांनी केले. शिबीर यशस्वी करण्यासाठी विद्यार्थी प्रतिनिधी अथर्व गवळी, शिवम रुद्र, साहिल राऊत, अपूर्वा चव्हाण, ईश्वरी म्हस्के, वेदांग जाधव, वैष्णवी बांगले यांनी परिश्रम घेतले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार