सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

महाराष्ट्रात बर्ड फ्लूचा शिरकाव; उरण नंतर नांदेडमध्ये हाय अलर्ट जाहीर

हा एक विषाणू आहे जो पक्ष्यांमध्ये वेगाने पसरतो. त्याच्या H5N1 प्रकारामुळे मानवांमध्ये गंभीर संसर्ग होऊ शकतो.

Sudarshan MH
  • Jan 27 2025 10:18AM

नांदेड: महाराष्ट्रात पुन्हा एकदा बर्ड फ्लूचा शिरकाव झाला आहे. उरण नंतर नांदेडमध्ये हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. हजारो कोंबड्या आणि अंडी नष्ट झाल्या आहेत. त्यामुळे १० किलोमीटर परिसरात हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. नांदेड जिल्ह्यातील किवळा इथं मृत कोंबड्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे पशूसंवर्धन विभागानं परिसरातील कोंबड्या आणि अंडी नष्ट केली आहेत. पशू संवर्धन विभागानं आता परिसरात उपाययोजना सुरू केल्या आहेत. नागरिकांनीही कोंबड्याचं मांस खाताना शिजवून घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. तसेच प्रशासनाने नागरीकांनी भीती बाळगू नये, असेही सांगण्यात आले आहे.

ढालेगावच्या पोल्ट्री फार्ममध्ये पिल्लांच्या मृत्यूनंतर प्रशासन या प्रकरणाची चौकशी करत आहे. या पिल्लांच्या मृत्यूचे कारण बर्ड फ्लू आहे की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, हा विषाणू केवळ पक्ष्यांनाच नाही तर इतर प्राण्यांना आणि मानवांनाही प्रभावित करू शकतो. हा एक विषाणू आहे जो पक्ष्यांमध्ये वेगाने पसरतो. त्याच्या H5N1 प्रकारामुळे मानवांमध्ये गंभीर संसर्ग होऊ शकतो. हा विषाणू प्रामुख्याने संक्रमित पक्ष्यांच्या लाळ, नाकातील स्राव किंवा घाणीच्या संपर्कातून पसरतो.

महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील ढालेगाव येथील एका पोल्ट्री फार्ममध्ये अलिकडेच ४००० पेक्षा अधिक पिल्लांचा मृत्यू झाल्याने बर्ड फ्लू होण्याची शक्यता वाढली आहे. यापूर्वी उदगीरमध्ये बर्ड फ्लूमुळे ५० कावळ्यांचा मृत्यू झाल्याची खात्री झाली आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार