सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

कोल्हापूरमध्ये मध्यवर्ती बसस्थानकाजवळ पोलीस अधिकार्‍यास ३ जिहाद्यांकडून बेदम मारहाण; तिघांवर गुन्हा नोंद

जिहादी अकिब पठाण, दिलदार मुजावर आणि जावेद मुजावर या तिघांवर गुन्हा नोंद झाला आहे.

Sudarshan MH
  • Jan 30 2025 11:49AM

कोल्हापूर: मध्यवर्ती बसस्थानकात उतरल्यानंतर शाहूपुरी पोलीस ठाण्याकडे निघालेले साहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल मुळे यांना खासगी ट्रॅव्हल्सच्या एजंटनी बेदम मारहाण केली. हा प्रकार २८ जानेवारीला रात्री ११.३० वाजता महालक्ष्मी चेंबरसमोर घडला. विशाल मुळे यांच्या तक्रारीनुसार, जिहादी अकिब पठाण, दिलदार मुजावर आणि जावेद मुजावर या तिघांवर गुन्हा नोंद झाला आहे. तसेच या तिघांपैकी दिलदार मुजावर आणि जावेद मुजावर या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

विशाल मुळे हे शाहूपुरी पोलीस ठाण्याकडे जातांना महालक्ष्मी चेंबरसमोर खासगी ट्रॅव्हल्सचा एजंट अकिब पठाण धावत आला. ‘पुण्याला जाणारी ट्रॅव्हल्स लागली आहे’, असे म्हणत तो हाताला धरून ओढू लागला. विशाल मुळे यांनी त्याला स्वतः पोलीस अधिकारी असल्याचे सांगितले. तरीही तो बसपर्यंत ओढून घेऊन गेला. यावरून दोघांमध्ये बाचाबाची झाली. विशाल मुळे हे पोलीस निरीक्षक संतोष डोके यांना भ्रमणभाषवरून घडलेल्या प्रकाराची माहिती देत असतांना तिघांनी त्यांना बेदम मारहाण केली. विशाल मुळे हे साध्या वेशात होते. आपण पोलीस अधिकारी असल्याचे ते ओरडून सांगत होते; पण पोलीस आहेस ना? तुला बघून घेतो, असे म्हणत तिघांनी त्यांना मारहाण केली.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार