सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नाशिक हिंसाचार प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; १५०० जणांवर गुन्हा तर २५ आरोपी अटकेत

नाशिक हिंसाचार प्रकरणी आतापर्यंत २५ जणांना अटक केली. तर १५०० जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Sudarshan MH
  • Apr 17 2025 1:49PM

नाशिक: नाशिकच्या काठेगल्लीमध्ये असलेली अनधिकृत दर्गा हटवण्यापूर्वी मंगळवारी मध्यरात्री जोरदार दंगा झाला होता. ही दर्गा हटवण्याआधीच नाशिकमध्ये तणाव निर्माण होत जिहादी जमावाने पोलिसांवर दगडफेक केली. या दगडफेकीमध्ये २१ पोलिस जखमी झाले तर अनेक वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. या हिंसाचार प्रकरणी १४०० ते १५०० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

या हिंसाचार प्रकरणी नाशिक पोलिसांकडून कठोर कारवाई सुरू आहे. जमावाने केलेला हल्ला पूर्वनियोजित असल्याचा पोलिसांचा संशय आहे. जमावाने पोलिसांवर फेकलेले दगड, विटा, टाईल्स तपासणीसाठी फॉरेन्सिक टीमकडे पाठवले आहेत. व्हायरल व्हिडीओ आणि सीसीटीव्हीच्या आधारे नाशिक पोलिसांचा तपास सुरू आहे. पोलिस गुन्हा दाखल केलेल्या सर्व आरोपींचा शोध घेत आहेत. या घटनेनंतर अनेक आरोपी फरार झाले.

आतापर्यंत ५७ संशयित आरोपी निष्पन्न झाले आहेत. तर २५ जणांना नाशिक पोलिसांनी अटक केली. संशयित आरोपींमध्ये एका विधी संघर्षित बालकाचाही समावेश आहे. नाशिक हिंसाचार प्रकरणात कारवाई करण्यात आलेल्या संशयित आरोपींमध्ये काँग्रेसचे हनिफ बशीर, ठाकरेंच्या शिवसेनेचे निलोफर शेख, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे अरीफ हाजी पटेल शेखचा देखील समावेश आहे. कट रचणे, अफवा पसरवणे, प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष हिंसाचार घडविण्यात सहभाग असल्याने या सर्वांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार