सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

दीनानाथ हॉस्पिटलच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू? जुळ्यांना जन्म देऊन आईने जीव सोडला

तनिषा भिसे यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यासाठी आणण्यात आले होते. मात्र उपचारासाठी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल प्रशासनाने रुग्णाच्या नातेवाईकांकडे 10 लाख रुपयांची मागणी केली.

Sudarshan MH
  • Apr 4 2025 10:53AM

पुणे: पुण्यातील दीनानाथ मंगेशकर या धर्मादाय नोंदणी असलेल्या रुग्णालयातच रुग्णसेवेला तडा गेला असून गर्भवती महिलेवर वेळीच उपचार न केल्याने तिचा मृत्यू झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. एका गर्भवती महिलेला पुण्यातील दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करतेवेळी अगोदर १० लाख रुपये भरावे, त्यानंतरच दाखल केले जाईल, असा पवित्रा रुग्णालय प्रशासनाने घेतला होता. त्यामुळे, संबंधित महिलेला दुसऱ्या रुग्णालयात उपचारासाठी, प्रसुतीसाठी दाखल करण्यात आले. मात्र, दोन जुळ्या मुलींना जन्म दिल्यानंतर दुर्दैवाने महिलेचा मृत्यू झाला.

 
या घटनेवरुन आता सर्वत्र संताप व्यक्त होत असून आमदार अमित गोरखे यांनीही याप्रकरणी पोलिसांत धाव घेतली आहे. तर, रुग्णालय प्रशासनाच्यावतीनेही आपली बाजू मांडण्यात आली आहे. पुण्यातील महिलेच्या मृत्यू प्रकरणात दीनानाथ रुग्णालयाकडून रुग्णालयात अंतर्गत चौकशी करण्यात आली आहे. रुग्णालय प्रशासनाकडून वस्तुस्थिती राज्य सरकारला देण्यात येणार आहे, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. 
 
तनिषा भिसे यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यासाठी आणण्यात आले होते. मात्र उपचारासाठी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल प्रशासनाने रुग्णाच्या नातेवाईकांकडे १० लाख रुपयांची मागणी केली. इतके पैसे अचानक कसे आणायचे? असा प्रश्न गर्भवती महिलेच्या कुटुंबीयांना पडला. अखेर अडीच लाख भरायला तयार असतांनाही रुग्णालय प्रशासनाने गर्भवती महिलेला प्रसुतीसाठी दाखल करून घेतलं नाही. परिणामी तिला इतर रुग्णालयात हलवण्याचा निर्णय कुटुंबीयांनी घेतला. दुसऱ्या रुग्णालयात हलवत असतांना महिलेला त्रास झाला. या महिलेचे पती सुशांत भिसे हे भाजप आ. अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक आहेत.
 
रुग्णालयात पत्नीला दाखल करून घेत नाहीत म्हणल्यावर दीनानाथ रुग्णालयाला मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातून रामेश्वर नाईक यांनी फोन केला. तरीही रुग्णालय प्रशासनाने त्यांचं ऐकलं नाही. परिणामी गर्भवती महिलेने दोन गोंडस जुळ्या मुलांना जन्म दिला मात्र महिलेचा जीव गमावला. या घटनेबाबत आमदार अमित गोरखे यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रारही केली आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार