भाजपाच्या वतीने चित्रपट टॅक्स फ्री – आ.संभाजी पाटील निलंगेकर
कश्मिरमध्ये 90 च्या दशकात हिंदु आणि कश्मिरी पंडित यांच्यावर झालेल्या अत्याचाराचे सत्य आणि वास्तव या चित्रपटाच्या माध्यमातून दाखविण्यात आले असल्याचे सांगत हा चित्रपट प्रत्येक भारतीयांनी पाहणे अत्यंत गरजेचे असल्याचे आ.संभाजी पाटील निलंगेकर यांनी सांगितले हा चित्रपट देशातील अनेक राज्यामध्ये टॅक्स फ्री करण्यात आलेला असुन महाराष्ट्रातही टॅक्स फ्री करण्यात यावा अशी मागणी भाजपासह अनेक सामाजिक संघटनानी महाविकास आघाडी सरकारकडे केली आहे.