पिंपरी - चिंचवड: पिंपरी - चिंचवडमध्ये पाच बांगलादेशी नागरिकांना पोलिसांना अटक केली आहे. बनावट कागदपत्रांसह बेकायदा पिंपरी - चिंचवड शहरातील भोसरी परिसरात हे बांगलादेशी नागरिक राहत होते. पिंपरी चिंचवड पोलिसांच्या दहशत विरोधी शाखेनं ही कारवाई केली आहे.
भोसरीच्या शांतीनगर येथे भारतीय नागरिक असल्याचे भासवून हे बांगलादेशी घुसखोर राहत होते. शांतीनगर येथील ओम क्रिएटिव्ह टेलर्स या कंपनीत ते काम करत होते. याबाबत दहशतवादी विरोधी शाखेला माहिती मिळाल्यांनतर त्यांनी छापा टाकून या पाचही बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे.
पिंपरी - चिंचवड़ पोलिसांकडून अटक केलेल्या बांगलादेशी नागरिकांकडून बनावट आधार कार्ड, जन्माचे दाखले, शाळा सोडल्याचे दाखले आणि पासपोर्ट जप्त करण्यात आले आहे. शामीम नुरोल राणा, राज उर्फ सम्राट सदन अधिकारी, जलील नुरू शेख उर्फ जलील नूर मोहम्मद गोलदार, वसीम अजीज उलहक मंडल उर्फ वसीम अजीजऊल हक हिरा आणि आझाद शमशुल शेख उर्फ मोहंमद अबुल कलाम शमशुद्दिन फकीर अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
या संपूर्ण प्रकरणांमध्ये पोलिसांनी केलेल्या कारवाईत बांगलादेशी घुसखुरांकडे भारतीय नागरिक असल्याचे पुरावे मिळाले हे पुरावे नेमके त्यांना कोणी बनवून दिले यांना नेमकं कोण मदत करता याबाबत अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित करण्यात आले असून यांना बनवून देण्यात आलेले आधार कार्ड इथले रहिवासी पुरावे मोबाईलचे सिम कार्ड एनएमके कोणी दिले व कोणी यांना मदत केली याची चौकशीही या ठिकाणी आता पिंपरी चिंचवड पोलिस करत आहे.