सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

घाटकोपरमधून ९ तर ठाण्यातून ४ बेकायदेशीर राहणाऱ्या बांगलादेशी महिलांना अटक

या बेकायदेशीर राहणाऱ्या बांगलादेशी महिलांना घर भाड्यानं देणाऱ्या घरमालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Sudarshan MH
  • Jan 30 2025 12:05PM

ठाणे: ठाण्याच्या उथळसर प्रभाग समितीच्या कार्यालयाच्यामागे मनोर पाडा, टीएमसी पुनर्वसन चाळ, ठाणे पश्चिम येथे बांगलादेशी घुसखोर राहत असल्याची माहिती गुन्हे शाखा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या अधिकारी चेतना चौधरी यांना मिळाली. त्यांनी एक पथक नेमून धाड टाकली असता त्यांना चार बांगलादेशी महिला बेकायदेशीररित्या राहत असल्याचं दिसून आलं. त्यांच्याकडे भारतीय असल्याचे कुठलेही पुरावे आढळले नाहीत.

पोलीस पथकानं बांगलादेशी महिलांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधात राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. तर उथळसर परिसरात बांगलादेशींना चौकशीविना भाड्यानं घर देणाऱ्या मालकांच्या विरोधातही पोलीस पथकानं राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतना चौधरी यांनी दिली.

चारही महिलांनी अवैध मार्गाने भारत - बांगलादेश सीमेवरून लपून देशात घुसखोरी केली. शाजिदा जहीरूद्दीन खातुन, (३८, रा. बामनखली, ठाणा - कालारोआ, जि. सातखिरा, ढाका, बांग्लादेश), शालीना मलिक मुल्ला (५० रा. ग्राम हिजालती, ठाणा - खुलना, जि. सातखिरा, ढाका, बांग्लादेश), रत्ना खोजदिल बिरोश खातुन (४० रा. ग्राम अग्रभ्रत भुलट पोस्ट गोगा, जि. जैसोर, ढाका, बांग्लादेश) आणि रेश्मा शहाजहान ढाली (४० मुळ रा. ग्राम रूद्रपुर, ठाणा शश्या, जि. जैसोर, ढाका, बांग्लादेश) अशी घुसखोर बांगलादेशी महिलांची नावे आहेत.

गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाच्या अटक केलेल्या महिलांपैकी एक महिला लहान मुलांना अंघोळ घालण्याचं काम करीत होती. तर एक महिला बिअर बारमध्ये काम करीत होती. तर अन्य दोघी घरकाम करीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. देशात घुसखोरी केल्यानंतर बांगलादेशी महिला राबोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत विनापरवानगी भाडेतत्वावर राहत असल्याचं समोर आलं. मिळालेल्या माहितीनुसार बहुतांशी बांगलादेशी घुसखोर हे पुरुष बारमध्ये वेटर, बांधकामावर मजूर, हंगामानुसार फळविक्रेते भाजी विकण्याचं काम करतात. तर बांगलादेशी महिला घरकाम, बारमध्ये वेटर, डान्सबारमध्ये डान्सर किंवा वेश्या व्यवसायामध्ये गुरफटलेल्या आढळतात.

अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षानं चार बांगलादेशी महिलांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी केली. या पडताळणीत महिला बांगलादेशी असल्याचं समोर आलं. नियमानुसार भाडेकरुंची कागदपत्रे घेतल्याशिवाय घरमालक त्यांना भाड्यानं घर देऊ शकत नाही. घरमालक नितीन कोंडीलकर यांनी पोलीस पडताळणी न करता घर दिल्याबाबत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. अद्याप, पोलिसांनी घरमालकाला अटक केलेली नाही.

मुंबई पोलिसांनी शहरात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांगलादेशींना शोधण्यासाठी विशेष मोहिम हाती घेतली आहे. या मोहित किमान नऊ बांगलादेशी स्थलांतरितांना घाटकोपरमधून अटक करण्यात आली. बांगलादेशींसोबत त्यांची लहान मुलेदेखील असल्याचं पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं. धक्कादायक बाब म्हणजे बांगलादेशींकडं बनावट भारतीय कागदपत्रे आढळली आहेत. राज्य सरकारनं राज्यात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांगलादेशी स्थलांतरितांना हाकलून लावण्यासाठी कडक कारवाई करण्याचे यापूर्वीच पोलिसांना आदेश दिले आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार