मुंबई: मुस्लिम मतांसाठी बाळासाहेबांच्या विचारांशी आणि हिंदुत्वाशी गद्दारी करणाऱ्या उबाठाची हिंदू समाजातील विश्वसार्हता संपली, अशा शब्दांत शिवसेना उपनेते व प्रवक्ते संजय निरुपम यांनी आज घणाघाती टीका केली. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. उबाठाच्या दुटप्पी भूमिकेवर हिंदूंमध्ये संतापाची लाट असून वक्फ सुधारणा विधेयकाला विरोध करणाऱ्या उबाठाला बाळासाहेबांचे नाव घेण्याचा अधिकार नाही, असे निरुपम यांनी खडसावले.
तसेच उबाठाच्या नेत्यांनी वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक हे कोणत्याही जाती धर्माशी संबंध नसून स्थावर मालमत्तेशी संबधित आहे. वक्फ बोर्डाच्या ताब्यात जवळपास २ लाख कोटींची जमीन आहे, असेही उबाठा नेत्यांनी म्हटले आहे. त्यावर निरुपम म्हणाले, की उबाठावाल्यांना प्रॉपर्टीमध्ये पहिल्यापासूनच इंटरेस्ट असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे वक्फच्या जमीनींवर देखील उबाठाचे लक्ष होते का असा सवाल निरुपम यांनी केला.