सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

दगडापासून वाळू योजनेला आता उद्योगाचा दर्जा; राज्यातील वाळू तस्करीला आळा घालण्यासाठी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

काही वाळू माफियांनी कारनामे चालू ठेवण्यासाठी आणि शासकीय कर्मचार्‍यांवर दहशत बसविण्यासाठी गुंडांच्या टोळ्या पाळलेल्या दिसून येतात. शासकीय कर्मचार्‍यांप्रमाणेच सर्वसामान्य नागरिकांनाही त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.

Sudarshan MH
  • Apr 9 2025 10:04AM
मुंबई: राज्यातील वाळू तस्करीला आळा घालण्यासाठी, दगडापासून वाळू तयार करण्यासाठी एम - सँड ही योजना राबवण्यात येत आहे. मात्र, उत्पादनवाढीसाठी या योजनेला उद्योगाचा दर्जा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याबाबतचा प्रस्ताव तातडीने मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडण्यात येणार असल्याची माहिती मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माध्यमांना दिली आहे.

 

राज्यातील विविध नद्यांच्या पात्रात वाळू माफिया टोळ्यांकडून उघडपणे वाळू उपसा सुरू असतो. रात्री दहानंतर ते पहाटे पाच वाजेपर्यंत जेसीबी, पोकलेन व यांत्रिक बोटीच्यांही सहाय्याने बेकायदा वाळू उपसा केला जातो. वाळू लिलावांवर बंदी असूनही हे गैरप्रकार सर्रास सुरू आहेत. तशातच महसूल विभागाच्या हलगर्जीपणामुळे या वाळू तस्करांच्या टोळ्यांना अप्रत्यक्ष मदत होते. त्यातून हप्ते वसुलीद्वारे भ्रष्टाचार होत असल्याच्या तक्रारी थेट विधीमंडळातही होत असतात यावर उपाय म्हणून, राज्य सरकारने वाळू विक्रीचे लिलाव थांबवले आणि दगडाचा चुरा करून ती वाळू वापरण्यास प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला. या वाळूलाच एम - सँड म्हटले जाते.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार