सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

मुंबई २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड तहव्वूर हुसैनला १८ दिवसांची एनआयए कोठडी

तहव्वूर हुसैनला अमेरिकेतून प्रत्यार्पित करण्यात आल्यानंतर त्याला कोर्टात हजर करण्यात आलं. यावेळी कोर्टाबाहेर अभूतपूर्व बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Sudarshan MH
  • Apr 11 2025 8:03AM

नवी दिल्ली: अखेर मुंबईवरील २६/११ च्या हल्ल्याचा मास्टरमाईंड तहव्वूर हुसैन याला पटियाला हाऊस कोर्टात हजर करण्यात आलं. विमानतळावर आल्यानंतर तहव्वूर हुसैनला अडीच तासानंतर कोर्टात आणण्यात आलं. त्यानंतर कोर्टात सुनावणी सुरू झाली. यावेळी एनआयएच्या वकिलांनी तहव्वूर हुसैनची २० दिवसाची कोठडी मागितली. तहव्वूर हुसैनच्या कोठडीची कारणंही वकिलाने कोर्टासमोर मांडली. तसेच हुसैन हा आंतरराष्ट्रीय दहशतवादी असल्याने काही पुरावे आणि तथ्य मिळवण्यासाठी त्याची कोठडी हवी आहे, असा युक्तिवाद एनआयएच्या वकिलांनी केला. कोर्टाने हा युक्तिवाद ग्राह्य धरून हुसैन याला १८ दिवसांची कोठडी दिली आहे.

एनआयएच्या वकिलांनी सुनावणीच्या वेळी खटल्याशी संबंधित काही तथ्य समोर ठेवले. सुनावणी बंद खोलीत झाली. कोर्टात तहव्वूर हुसैन, लीगल सर्व्हिस ऑथॉरिटीने दिलेला त्याचा वकील आणि एनआयएच्या लीगल टीमसह जज आणि कोर्टाचा स्टाफ उपस्थित होता. एनआयएकडून ज्येष्ठ वकील कृष्णन यांनी कोर्टात युक्तिवाद केला. कोर्टात सुनावणी सुरू असताना सुरक्षा रक्षकांचा कोर्टाबाहेर मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सुरक्षा रक्षकांनी कोर्टाबाहेर रूट मार्च काढला. या परिसरात वाहनांना मज्जाव करण्यात आला होता. कोणत्याही वाहनाला कोर्ट परिसरात प्रवेश दिला जात नव्हता. तसेच कोणत्याही व्यक्तीला आत सोडण्यात येत नव्हते.

तहव्वूर हुसैन याच्या प्रत्यार्पण प्रकरणी अमेरिकेच्या न्याय विभागाचे प्रवक्ते निकोल नवास ऑक्समन यांनी मीडियाशी संवाद साधला आहे. प्रत्यार्पण २६/११ च्या पीडितांना न्याय देण्यासाठीचं महत्त्वाचं पाऊल आहे. अमेरिकेने दोषी दहशतवादी तहव्वूर राणाला भारतातील हल्ल्याप्रकरणी प्रत्यार्पित करण्यात आले आहे. त्याच्याशी संबंधित १० गुन्हे भारताने दाखवले होते. दहशतवादी हल्ल्यात सहा अमेरिकन नागरिकांचा मृत्यू झाला होता. हुसैनचं प्रत्यार्पण म्हणजे त्या अमेरिकन नागरिकांना न्याय देण्यासाठी उचलण्यात आल्याचं हे पाऊल आहे, असं निकोल नवास ऑक्समन म्हणाल्या.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार