सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

तीर्थक्षेत्र भामचंद्र डोंगरावर अश्लील चाळे करणाऱ्या तरुणाला वारकरी साधकाने रोखल्याने साधकास गंभीर मारहाण केल्याची धक्कादायक घटना

खेड तालुक्यातील चाकण येथील औद्योगिक क्षेत्रात वासुली गावात असणाऱ्या भामचंद्र डोंगराला संत तुकाराम महाराज यांची अभ्यास भूमी आणि साक्षात्कार भूमी म्हणून ओळखले जाते.

Shruti Patil
  • Jun 18 2024 12:19PM

चाकण: संपूर्ण महाराष्ट्राचे वारकरी संप्रदायाचे पाईक श्री संत तुकाराम महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या तीर्थक्षेत्र भामचंद्र डोंगरावर मुलीसोबत येऊन अश्लील चाळे करणाऱ्या तरुणाला आध्यत्मिक अभ्यास करणाऱ्या वारकरी साधकाने रोखल्यामुळे संबंधित तरुणांने टोळक्याला बोलावून साधकास गंभीर मारहाण करण्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्याने भामचंद्र डोंगर पंचक्रोशीतील ग्रामस्थांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.

खेड तालुक्यातील चाकण येथील औद्योगिक क्षेत्रात वासुली गावात असणाऱ्या भामचंद्र डोंगराला संत तुकाराम महाराज यांची अभ्यास भूमी आणि साक्षात्कार भूमी म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी राज्याच्या कानाकोपऱ्यातून असंख्य साधक या ठिकाणी वर्षानुवर्षे राहून संत तुकाराम महाराज यांच्यावर अभ्यास करतात. आजही या ठिकाणी जवळपास ३० ते ४० विद्यार्थी अभ्यास करतात.

रविवारी(दि. १६) एक तरुण मुलगा आणि एक मुलगी डोंगरावर आल्यानंतर त्यांचे अश्लील चाळे सुरू होते. ते बघून तेथील एक साधक कुलदीप शिवगोंडा खोत या अभ्यास करणाऱ्या वारकरी विद्यार्थ्यांने त्यांच्या चुकीच्या कृत्यासाठी त्यांना रोखले. त्या तरुणाने अभ्यास करणाऱ्या साधकाला शिवीगाळ करत मारहाण केली आणि संध्याकाळी पुन्हा मित्रांना बोलावून गंभीर मारहाण केली. यामध्ये साधक विद्यार्थ्याचा पाय मोडला असून त्याच्या सोबतच्या एका विद्यार्थ्याला देखील गंभीर जखमी केले आहे. या साधकावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या घटनेचा भामचंद्र डोंगर सप्ताह समितीने निषेध केला असून, असे कृत्य करणार्‍या तरुणांच्या टोळक्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. भामचंद्र डोंगरावर यापूर्वी देखील अनेक साधकांना धमकावण्याचे प्रकार घडले आहेत. धार्मिक भूमीवर असे गैर आणि अश्लील कृत्य घडत असेल, तर यावर पोलिस प्रशासनाने कडक कारवाई करायला हवी, अशीही मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.

या प्रकरणी निखील संतोष गव्हादे (वय-२१ वर्षे), प्रथमेश संतोष भोजणे (वय-२१ वर्षे), गणेश पांडुरंग जमावे (वय-१८ वर्षे), युवराज चंद्रमणी पाटील (वय-२२ वर्षे) या चार आरोपींना महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. पंचक्रोशीतील नागरिकांकडून या घटनेचा निषेध करण्यात आला असून मारहाण करणाऱ्या तरुणांवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार