सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाला अजित पवारांना बोलावणार नाही - आ. गोपीचंद पडळकर

या कार्यक्रमाला अजित पवारांना बोलावणार नाही, अशी भूमिका भाजप आ. गोपीचंद पडळकरांनी घेतली आहे.

Sudarshan MH
  • Apr 17 2025 9:49AM

पुणे: पुण्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या ३०० व्या जयंतीनिमित्त ३१ मे रोजी तब्बल ५० हजार धनगरी ढोल वाजवून अभिवादन करण्यात येणार आहे. या भव्य कार्यक्रमासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह येणार आहेत. तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत इतर सगळया मंत्र्यांना बोलावणं गेलं आहे.

मात्र, या कार्यक्रमाला अजित पवारांना बोलावणार नाही, अशी भूमिका भाजप आ. गोपीचंद पडळकरांनी घेतली आहे. हा कार्यक्रम धनगरांचा असून धनगरांनी ठरवलेला आहे. हा कार्यक्रम शासकीय नाही. त्यामुळे अजित पवारांना बोलवणार नाही, असं बोलून पडळकरांनी अजित पवारांविरोधातील हत्यार अजून म्यान केलेली नाही, असं स्पष्ट केलं आहे. आम्ही एक रचनात्मक कार्यक्रम करत आहोत. ही किरकोळ बाब आहे. तुम्ही उगाच राजकीय प्रश्न विचारु नका असं म्हणत त्यांनी जास्त भाष्य करणं टाळलं.

 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार