सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को सहयोग करे

Donation

ऊसाच्या रसापासून इथेनॉलचे उत्पादन बंद करण्याचे आदेश

ऊसापासून निर्मित इथेनॉलवर बंदी.

Shruti Patil
  • Dec 8 2023 10:23AM

नवी दिल्ली: ऊसाच्या रसापासून इथेलॉनचे उत्पादन बंद करण्याच्या आदेशामुळे पेट्रोलमध्ये २०२५ पर्यंत २० टक्के इथेनॉल मिश्रणाचे लक्ष्य गाठणे कठीण होणार आहे. इथेनॉलच्या निर्मितीमुळे मागील वर्षी  साखर उत्पादन ४१ लाख टनांनी घटले, पण आता २१ लाख टनांची भर पडून साखर उत्पादन २९५ लाख टन होण्याची शक्यता आहे.

साखरेच्या उत्पादनात घट होण्याच्या शक्यतेमुळे ऊसापासून इथेनॉल निर्मितीला सन २०२३-२४ च्या हंगामात खीळ बसली आहे. त्यामुळे या हंगामात ऊसाच्या रसापासून इथेनॉलचे उत्पादन तात्काळ प्रभावाने बंद करण्याचे आदेश केंद्रीय ग्राहक संरक्षण, अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने आज सर्व साखर कारखाने आणि डिस्टिलरींना दिले.

साखर नियंत्रण आदेशातील खंड ४ आणि ६ अन्वये  इथेनॉल निर्मिती न करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. उसाचा रस आणि बी - हेवी मोलासेसपासून तयार केलेले इथेनॉल तेल विपणन कंपन्यांनी खरेदी करू नये, असेही म्हटले आहे. सी-हेवीपासून तयार होणाऱ्या इथेनॉलला आणि मक्यापासून इथेनॉलचे उत्पादन करण्यासाठी सरकारने प्रोत्साहन दिले आहे.  

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

ताजा समाचार