सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

मलेशियात 'रामकृष्णहरी'चा गजर; संत नामदेव महाराज यांच्या चरण पादुकांचे आज नर्सीनामदेव येथून प्रस्तान

भक्तिपथ सेवा फाउंडेशन च्या वतिने विदेशात पोचवले जाणार वारकरी साप्रदायाच्या संतांचे विचार...

Sudarshan MH
  • Jul 28 2024 5:56PM
हिंगोली: भागवत धर्माची पताका थेट पंजाबपर्यंत पोहोचवणाऱ्या संत नामदेव महाराजांचा समाधी सोहळा आता थेट मलेशियात होणार आहे. मलेशियातील क्वालालंपूर येथे तीन दिवस 'रामकृष्णहरी'चा गजर होणार आहे. भक्तिपथ फाउंडेशनने यासाठी पुढाकार घेतला आहे. आज सकाली नामदेव महाराजांचे जन्मस्थान असलेल्या नर्सी नामदेव येथून संत नामदेव महाराज मंदिरत चरणपादुकांचं विधिवत पूजा आरती करत हरिनामाच्या गजराज स्वामी भारतानंद सरस्वतीजी महाराज व भक्तीपत फाउंडेशनचे अध्यक्ष शेष जी महाराज व स्थानिक नागरिक मंदिराचे मुख्य पुजारी,वारकरी व स्थानीक नागरिकांच्या यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आले आज हिं दिंडी आळंदी येथे पोहोचणार असून उद्या दि.29 जुलै रोजी आळंदी येथे सकाली 11वा. संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधीचे दर्शन व नगरप्रदक्षिणा करून ही दिंडी मुंबई एरपोर्ट येथुन हवाईजहाज ने मलेशिया क्वालालंपूर कडे प्रस्थान करण्या येनार आहे।30 जुलैला दिंडी मलेशिया येथील क्वालालंपूर येथे पोहोचणार आहे.

 

त्याच बरोबर क्वालालंपूर येथील कार्तिकस्वामी मंदिरात विविध कार्यक्रमा चे आयोजन करण्यात आले आहे 1 व 2 ऑगस्टरोजी संत नामदेव महाराजांच्या चरणपादुकांचं पाद्यपूजन अभिषेक सोहळ्या सपंन्न होनार आहे। त्याचबरोबर स्वामी भारतानंद सरस्वतीजी महाराज यांचे कीर्तन होणार असून त्याच्या सुप्रसिद्ध गायक जगदीश चव्हाण, रामेश्वर डांगे, गायत्रीदिदि गायकवाड यांचा भजना चा कारेक्रम होनार आहे।तसेच 25 पेक्षा अधिक भाविकांना संत नामदेव गाथा ग्रंथ चे वितरित केला जाणार आहे.
 
ह्या सपुर्ण कारेक्रमाचे आयोजन भक्तिपथ सेवा फाउंडेश आळंदी चे संस्थापक अध्यक्ष शेषजी महाराज यांच्यासह उपाध्यक्ष दीपक चव्हाण सचिव हनुमान घोंगडे, सल्लागार.ॲड निलेश आंधळे यांच्यासह पदाधिका यांच्या वतिने विश्वभ्रमण दिंडीच्या माध्यमातून 51 देशांमध्ये थोर संतांचे विचार पोहोचवण्याचा संकल्प कण्यात आला आहे.त्यानुसार 2023 मध्ये संत ज्ञानेश्वर माउलींचा पालखी|सोहळा दुबई येथे पार पडला होता. त्यानंतर आता 2024 म्हदे भागवत धर्माची पताका थेट पंजाबपर्यंत संत नामदेव महाराजांचा समाधी सोहळा मलेशियातील क्वालालंपूर येथे आयोजित करण्यात आला आहे।ह्या सोहळ्यासाठी महाराष्ट्रातील, मराठवाडा, हिंगोली, परभणी, नांदेड, छत्रपती संभाजीनगर आणि पुणे, नाशिक, बारामती, जळगाव,धुळे,व मध्यप्रदेश येथील एकुन 60भावीक भक्त व तसेच मलेशियातील स्थानिक मराठी भाविकही दिंडीत सहभागी होणार असल्याची माहिती भक्तिपथ सेवा फाउंडेश आळंदी चे संस्थापक अध्यक्ष शेषजी महाराज यांनी दिली.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार