सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

अयोध्येतील महाराष्ट्र सदनाचे आज भूमिपूजन; भाविक आणि पर्यंटकांना मिळणार सोयी

महाराष्ट्र सदन हे अयोध्या श्रीराम जन्मभूमी मंदिरापासून सुमारे साडेसात किलोमीटर तर अयोध्याधाम रेल्वे स्टेशनपासून साडेचार कि.मी. अंतरावर आहे.

Sudarshan MH
  • Oct 8 2024 10:04AM

मुंबई: विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी महायुती सरकारने अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या महाराष्ट्र सदनाचे भूमिपूजन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आज मंगळवारी, ८ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेअकरा वाजता सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते हा भूमिपूजन सोहळा पार पडणार आहे.

अयोध्येत श्रीराम मंदिर व्हावं यासाठी महाराष्ट्रातील अनेक कार सेवकांनी उत्स्फूर्त आंदोलन केले होते. यात अनेकांनी बलिदन दिले होते. कार सेवकांच्या त्याग आणि बलिदानातून आज अयोध्येत प्रभू श्री रामाचे मंदिर उभे राहिले आहे. या मंदिराला भेट देण्यासाठी आणि प्रभू श्री रामाचे दर्शन घेण्यासाठी दररोज लक्ष लक्ष भाविक अयोध्येत दर्शनासाठी जात असतात. त्यात आपल्या महाराष्ट्रातील भाविकांची अत्यंत लक्षणीय संख्या आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील अतिथी, भाविक आणि पर्यंटकांच्या सोयीसाठी अयोध्या येथे महाराष्ट्र सदन उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने यापूर्वी घेतला होता.

प्रस्तावित जागेची अयोध्या येथे जाऊन पाहणी देखील केली होती. प्रास्तवित महाराष्ट्र सदन हे अयोध्या श्रीराम जन्मभूमी मंदिरापासून सुमारे साडेसात किलोमीटर तर अयोध्याधाम रेल्वे स्टेशनपासून साडेचार कि.मी. अंतरावर आहे. अयोध्येमध्ये नव्याने बांधण्यात आलेल्या महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळापासून सुमारे ११ कि.मी. अंतरावर महाराष्ट्र सदन उभे राहणार आहे, अशी माहितीही रवींद्र चव्हाण यांनी दिली होती.

यासाठी उत्तर प्रदेश सरकारने अयोध्येत महाराष्ट्र सदन उभारण्यासाठी २.३२७ एकरचा भूखंड मंजूर केला आहे. उत्तर प्रदेश सरकारच्या नियोजन विभागाच्यावतीने अयोध्या येथे राष्ट्रीय राजमार्ग, शरयू नदीजवळ ग्रीन फिल्ड टाऊनशिप विकसित करण्यात येत असून या ठिकाणी हा भूखंड उत्तरप्रदेश सरकारने मंजूर केला आहे. भूखंड अधिग्रहित करण्यासाठी ६७.१४ कोटी रुपयांची तरतूद सार्वजनिक विभागाच्यावतीने करण्यात आली आहे. तसेच या इमारतीचे बांधकाम, विद्युतीकरण आणि अन्य सोयी सुविधांसाठी सुमारे २६० कोटीच्या निधीचे अंदाजपत्रक तयार करण्यात आल्याची माहिती, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी तीन महिन्यांपूर्वी दिली होती.

राज्य सरकारने उत्तर प्रदेश सरकारला पहिला टप्प्यासाठी 10 टक्के रक्कम अदा केली होती. तसेच पुढील दोन महिन्यात जागेचा पूर्ण मोबदला अदा करून लवकरात लवकर महाराष्ट्र सदन बांधण्याची कार्यवाही सुरू होईल, असेही रवींद्र चव्हाण यांनी सांगितले होते.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार