सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नाशिकमध्ये पोलिसांच्या ८ वाहनांकडून तस्कराचा मध्यरात्री सिनेस्टाइल थरारक पाठलाग; १५ लाखांचा गांजा जप्त

नाशिक शहरात पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या “स्टॉप अँड सर्च” या अभिनव उपक्रमामुळे गुन्हेगारीला आळा घालण्याचा प्रयत्न यशस्वी ठरला आहे.

Sudarshan MH
  • Jan 8 2025 6:25PM
नाशिक: सोमवारी मध्यरात्री नाशिक पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. गुंगारा देऊन पसार झालेल्या गांजा तस्कराला पोलिसांनी सिनेस्टाईल pपाठलाग करून अटक केली आहे. स्टॉप अँड सर्च कारवाई करत असतांना लाल रंगाच्या कारमधून आलेल्या गांजा तस्कराने पोलिसांना हुलकावणी देत, चेक पोस्टवरून पळून गेला. यामुळे आरोपीकडे स्फोटक पदार्थ किंवा अमली पदार्थ असावेत, असा संशय पोलिसांना आला.
 
आडगाव पोलीस ठाण्याच्या सीआर मोबाईल पथकाचे अंमलदार पोशि पवार बाळकृष्ण व पोहवा गांगुर्डे भाऊराव हे पहाटे २.३० वाजता “स्टॉप अँड सर्च” मोहिमेत कार्यरत होते. लाल रंगाच्या मारुती एसएक्स ४ वाहनाने पोलिसांच्या तपासणीस नकार देत त्यांच्या अंगावर वाहन घालण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी प्रसंगावधान राखत स्वत:चा जीव वाचवला आणि तत्काळ नियंत्रण कक्षाला माहिती दिली.
 
नियंत्रण कक्षाने इतर विभागांना माहिती देत आठ पोलीस वाहनांची टीम तयार केली. या टीमने २५ किमी अंतर, २-३ तासांचा पाठलाग करत आरोपींच्या वाहनाला पकडले. पाठलागादरम्यान आरोपींनी चार पोलीस वाहनांना धडक दिली आणि गंभीर नुकसान करण्याचा प्रयत्न केला.
 
वाहनाची झडती घेतल्यावर २८ किलो गांजा सापडला, ज्याची किंमत १५ लाख रुपये आहे. पाच आरोपींपैकी चार अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले, तर एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. संबंधितांवर भारतीय दंड संहिता आणि एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अत्यंत धाडसी कारवाई केल्याबद्दल पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी संबंधित अधिकारी व अंमलदारांना प्रशस्तीपत्र आणि रोख पारितोषिक देऊन सन्मानित केले आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार