पुणे: संत ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या पालखीचे आज पुण्यनगरी पुणे शहरांमध्ये आगमन झाले असून या पुणे शहरातील शिवाजीनगर परिसरामध्ये शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्यावतीने दर वर्षाप्रमाणे यावर्षीही संत ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या पालखीचे गुरुवर्य संभाजीराव भिडे गुरुजी व त्याचे हजारो धारकऱ्यांकडून भव्य स्वागत व दर्शन करण्यात आले. यावेळी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक गुरुवर्य संभाजीराव भिडे गुरुजी यांनी जगद्गुरु तुकाराम महाराज व ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे दर्शन घेतले.
आज ज्ञानोबा - तुकोबांच्या पालखी सोहळ्यामध्ये देहू आळंदी ते पंढरपूर पायी चालणारे लाखो वारकरी व धारकरी यांच्या भक्तीगंगा व शक्तीगंगा संगम पुण्यात बघायला मिळाला. त्याचबरोबर राष्ट्रीय वारकरी परिषदेच्या वतीने स्वामी भारतानंद सरस्वतीजी महाराज व वारकरी संप्रदायाचे भीष्माचार्य गुरूवर्य वक्ते बाबा यांचे शिष्य यांच्या हातून गुरुवर्य संभाजी भिडे गुरुजी यांचा सन्मान करण्यात आला.