सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

सुट्टीवर असलेले कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचारी तेजस वाहुळेंमुळे आंतरराज्यीय टोळीचा पदार्फाश; तेजस वाहुळेंच्या कर्तव्यदक्षपणाचे होत आहे कौतुक

तेजस वाहुळे यांनी सुट्टीवर असतांनाही त्यांनी दाखवलेल्या कर्तव्यदक्षपणाचे कौतुक होत आहे.

Sudarshan MH
  • Jan 22 2025 4:12PM

बीड: गेल्या काही दिवसांपासून मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे बीड जिल्हा चर्चेत आला आह. आता पुन्हा एकदा बीड जिल्हा चर्चेत आला आहे. बीडहून अंबाजोगाईला आलेले पोलीस कर्मचारी तेजस वाहुळे यांच्यामुळे आंतरराज्यीय टोळीचा छडा लागला आहे. बस स्थानकात एका तरुणाची हालचाल पोलीस अधिकारी तेजस वाहुळे यांना संशयास्पद वाटली. त्यामुळे त्यांनी त्याच्यावर पाळत ठेवली आणि नंतर कारमधून जात असलेल्या चोराचा पाठलाग करून त्याला पकडले. मात्र त्याचे तीन साथीदार पळून गेले. दरम्यान, ताब्यात असलेल्या तरुणाकडे चोरीचे तब्बल ६३ मोबाईल फोन सापडले. यात ६ आयफोनचा समावेश आहे. महत्त्वाचे म्हणजे तेजस वाहुळे हे साप्ताहिक सुट्टीवर होते, असे असतांनाही त्यांनी दाखवलेल्या कर्तव्यदक्षपणाने आंतरराज्यीय टोळीचा छडा लागला.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस अधिकारी तेजस वाहुळे हे सध्या बीड पोलीस मुख्यालयात कर्तव्य बजावत आहेत. ते साप्तहिक सुटी असल्याने सध्या घरी होते आणि आज काही कामानिमित्त अंबजोगाई येथे आले होते. दुपारी मुलाची शाळा सुटेपर्यंत ते बस स्थानकात थांबले होते. यावेळी त्यांना एका तरुणाच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. सदर तरुण पाकीटमार किंवा मोबाईल चोर असू शकतो, अशी त्यांना खात्री पटली. यानंतर त्यांनी त्या तरुणावर पाळत ठेवली. थोड्याच वेळीत तरुण घाईगडबडीत बस स्थानकाच्या बाहेर पडला आणि रस्त्यावर थांबलेल्या एका कारमधून निघून गेला. कारमध्ये तरुणासोबत आणखी तीन जण होते. तरुण कारमधून निघून जाताच तेजस वाहुळे यांनी ऑटोरिक्षातून त्याचा पाठलाग करण्यास सुरुवात केली.

सदर तरुणाला आणि त्याच्या साथीदारांना कोणी आपला पाठलाग करत असल्याची कल्पना नव्हती. त्यामुळे तरुणाच्या साथीदाराने कार भगवानबाबा चौकातील पंपावर सीएनजी भरण्यसाठी थांबवली. यावेळी यावेळी कारमधील तिघेजण खाली उतरले तर बसस्थानकातील संशयित तरुण कार जवळच थांबला. यावेळी पाठलाग करत असलेले तेजस वाहुळे हे सीएनजी पंपाजवळ पोहचले. त्यांनी कारजवळ उभ्या असलेल्या चोराला काही समजण्याच्या आत पकडले आणि त्याची चौकशी सुरू केली. मात्र चौकशी सुरू असतांना चोराचे ३ साथीदार पळून जाण्यात यशस्वी झाले.

दरम्यान, तेजस वाहुळे यांनी पुन्हा चोराची चौकशी सुरू केली, मात्र तो काहीच बोलायला तयार नव्हता. अखेर पोलिसी खाक्या दाखवताच त्याने तो स्वत: नागपूरचा असल्याचे सांगितले. तसेच त्याच्यासोबत कारमध्ये असलेल्या तिघेजण झारखंडचे असल्याची माहिती दिली. यानंतर त्याने बस स्थानकातून एक मोबाईल चोरला असल्याचेही कबूल केले. त्यामुळे तेजस वाहुळे यांनी कारची झडती घेतली असता त्यांना ६३ मोबाइल आढळून आले. यात सहा आयफोनचाही समावेश आहे.

चोरी केलेले मोबाइल ट्रेस होऊ नये म्हणून चोरांनी ते चांदीच्या आवरणात गुंडाळून ठेवले होते. यानंतर तेजस वाहुळे यांनी चोराला मोबाईल आणि कारसह शहर पोलिसांच्या स्वाधीन केले. सध्या अंबाजोगाई शहर पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत. दरम्यान, तेजस वाहुळे यांनी सुट्टीवर असतांनाही त्यांनी दाखवलेल्या कर्तव्यदक्षपणाचे कौतुक होत आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार