सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

महाराष्ट्र हादरला! बंदोबस्तावरील पोलिसाकडून विसापूर किल्ला परिसरात पाच वर्षाच्या मुलीवर अत्याचार; रक्षकच बनले भक्षक

मावळमध्ये विसापूर किल्ला परिसरात पाच वर्षांच्या चिमुकलीवर बंदोबस्तावरील पोलिसाकडून लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संबंधित पोलीस कर्मचाऱ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

Sudarshan MH
  • Dec 27 2024 11:00AM
पुणे: खाकी वर्दीला काळीमा फासणारी घटना बुधवारी मावळ तालुक्यातील लोहगड विसापूर किल्ला परिसरामध्ये घडली आहे. बंदोबस्तावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने पाच वर्षाच्या अल्पवयीन मुलीसोबत अश्लील वर्तन, अतिप्रसंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. सचिन सस्ते असे या पोलिसाचे नाव असून त्याच्याविरुद्ध लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात पोक्सो, ॲट्रासिटी व भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करत त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाताळनिमित्त मावळ तालुक्यातील पर्यटन स्थळांवर पोलिसांकडून अधिकचा बंदोबस्त लावण्यात आला होता. पर्यटन स्थळावर सुट्टीच्या अनुषंगाने लोक फिरण्यासाठी येतात. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला होता. लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत येणाऱ्या विसापूर किल्ल्यावर पुणे ग्रामीण हेडक्वार्टर येथून अधिकचा बंदोबस्त मागविण्यात आला होता. त्यामध्ये पोलीस सचिन सस्ते हा देखील विसापूर किल्ला परिसरात बंदोबस्तावर होता.
 
विसापूर किल्ला पाहण्यासाठी पाच वर्षीय चिमुकली तिच्या आई-वडिलांसोबत आली होती. त्या चिमुकलीला सचिन सस्ते याने चॉकलेटचा आमिष दाखवले आणि आडोशाला नेले. तिथे तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार मुलीने आपल्या पालकांना सांगितला. पालकांनी तात्काळ पोलिसात धाव घेत गुन्हा दाखल केला. लोणावळा ग्रामीण पोलिसांनी पोलीस सचिन सस्ते याला अटक केली आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार