छत्रपती संभाजीनगर: प्रशासनाचा अधिकारी वर्ग यांच्या हलगर्जीपणामुळे धनगर समाजाच्या एस. टी. अनुसुचित जमातीमध्ये अंमलबजावणी करण्यासाठी धनगर समाजातील अत्यंत होतकरू हुशार मेहनत करणारा तरूण धनगर समाज बांधव रामेश्वर संजय आम्ले वय २५ वर्षे याने केली आत्महत्या. असा आरोप सकल धनगर समाजाने केला आहे.
रामेश्वर आम्ले हा धनगर समाजाच्या कुठल्याही कार्यक्रमामध्ये अति अग्रेसर आपल तनाने व मनाने समाजाच्या कार्यक्रमाला उपस्थीत राहत होता. मागील काही दिवसांत रस्ता रोको आंदोलनात त्याचा सहभाग होता आपल्या जिवाचं बलीदान सकल धनगर समाज बांधव व्यर्थ जावू देणार नाही.
रामेश्वर संजय आम्ले यांच्या परिवाराला जिवन जगण्याच्या उदनिर्वाहासाठी सकल धनगर समाज बांधवांची शासनाकडे मागणी केली तात्काळ रामेश्वर आम्ले याच्या परिवाराला 1 कोटी रक्कमेचा चेक देण्यात यावा व तसेच रामेश्वर आम्ले याच्या परिवारातील एका सदस्याला शासकीय नोकरीत समाविष्ट करण्यात यावे.
तसेच सकल धनगर समाजाची मागणी मान्य न झाल्यास सकल धनगर समाज लोकशाही मार्गाने तिव्र प्रकारे महाराष्ट्रभर आंदोलन छेडेल. असा तीव्र इशारा सकल धनगर समाजाकडून सरकारला देण्यात आला.