काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच ते अचानक कोमात गेले असल्याची माहिती नारायण हॉस्पिटलचे संचालक डॉ. सुनील खेमका यांनी रविवारी रात्री दिली आहे.
डॉ. खेमका यांनी सांगितले की, अजित जोगी यांना शनिवारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती अधिक नाजूक झाल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र, रविवारी रात्री उपचार सुरू असतानाच ते कोमात गेले आहेत.
दरम्यान, जोगी हे सध्या मारवाही विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यांनी 2000 ते 2003 या काळात छत्तीसगडचे मुख्यमंत्री म्हणून काम केले होते.