अमरावती: अमरावती जिल्ह्यात बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना जन्म प्रमाणपत्र देण्याचा घोटाळा उघडकीस आला आहे. अमरावतीतील अंजनगाव सुर्जी प्रकरणी अशीच एसआयटी स्थापन झाली आहे. अमरावती जिल्ह्याचे आकडे माझ्या हातात आहेत. भारतात जन्म - मृत्यू नोंद कायदा १९६९ मध्ये अंमलात आला आहे. नव्या कायद्यानुसार जन्म प्रमाणपत्र देण्याचे अधिकार तहसीलदारांना देण्यात आला आहे. मात्र यात मोठं षडयंत्र रचण्यात आलं आहे. यात शेकडो कोटी वापरण्यात आले आहे. तसेच काही राजकीय पक्षांचे नेते, काही मुस्लिम नेते आणि काही एनजीओ यांच्या संगनमताने महाराष्ट्रात काही क्षेत्र निवडले. यात मालेगाव आणि अंजनगाव सुर्जीचा समावेश असून अंजनगाव सुर्जी तहसील कार्यालयातून हजारो बनावट जन्म दाखले दिल्याचा आरोप गंभीर आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.
अंजनगावात 1184 अर्जापैकी एकही अर्ज फेटाळला गेला नाही. यातील एकानेही कोणत्या ठिकाणावर जन्म झाला याचा दाखला दिला नाही. महापालिका, नगरपालिकेनं नोंद नसल्याचं सांगितलं, यालाही जन्म प्रमाणपत्रासाठी वैध ठरवलं गेलं. अमरावती महानगराची लोकसंख्या 6 लाखांत असून 4638 अर्ज आलेत, हा आकडा देशात सर्वात जास्त आहेत. यातील एकाही अर्जात जन्माचा पुरावा नाही. अचलपुरमध्ये 2657 अर्ज आलेत. यातील 2527 लोकांना प्रमाणपत्र देण्यात आलेत. चांदूरबाजारमध्ये एकही अर्ज फेटाळला गेली नाही. अमरावती जिल्ह्यात यातून आतापर्यंत 14, 643 लोकांना अर्ज आले आहेत. यातील 8350 लोकांना प्रमाणपत्र दिले गेलेत. यातील 50 टक्के लोकांचे अर्ज डिसेंबरमध्ये आले आहेत.
तसेच मी अंजनगाव सुर्जीच्या तहसीलदारांशी 50 मिनिटे चर्चा केली. यावेळी त्यांना माझ्याकडे असलेले सर्व पुरावे आणि तथ्य समजावून सांगितलीत. मी या संदर्भात मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यासोबतच गृह सचिव आणि पोलिसांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना माझ्याकडची संपूर्ण माहिती दिली. त्यानंतरच मी भिवंडी मालेगाव आणि आता अंजनगाव सुर्जीला आलो आहे. अशीही माहिती किरीट सोमय्या यांनी यावेळी दिली.