सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

बिग बॉस सारख्या अश्लीलतेचा प्रसार करणाऱ्या कार्यक्रमावर बंदी आणा; भाजपा खा. अनिल फिरोजियांची लोकसभेत मागणी

हा कार्यक्रम सुरू झाला तेव्हा तो केवळ एक साधा कार्यक्रम होता. मात्र, नंतर त्यात अश्लीलता आणि शिवराळ भाषेचे प्रमाण वाढले. यामुळे हा कार्यक्रम केवळ प्रेक्षकांसाठीच नाही तर समाजासाठी धोकादायक ठरू शकतो, असे फिरोजिया यांचे म्हणणे आहे.

Sudarshan MH
  • Mar 28 2025 2:46PM
दिल्ली: छोट्या पडद्यावरील रिऍलिटी शो म्हणून बिग बॉस मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहे. प्रेक्षक उत्साहाने या शोच्या नव्या सीझनची वाट पाहात असतात. मात्र, या शो मधील कंटेंटवर अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते. अश्लीलता, शिवराळ भाषा या कार्यक्रमात प्रामुख्याने आढळते. या कार्यक्रमाच्या याच स्वरूपावरून हा कार्यक्रम बंद करण्याची मागणी होते आहे. भाजपचे खासदार अनिल फिरोजिया यांनी गुरुवारी लोकसभेत ही मागणी केली. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रिऍलिटी शो ‘बिग बॉस’वर तात्काळ बंदी घालण्याची मागणी अनिल फिरोजिया यांनी केली आहे. या कार्यक्रमातील अश्लीलता तसेच शिवराळ भाषेचा समाजावर वाईट परिणाम होत असल्याचे फिरोजिया यांचे म्हणणे आहे.
 
मध्य प्रदेशातील उज्जैन येथून लोकसभा खा. असलेले फिरोजिया यांनी प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान हा विषय उपस्थित केला. बिग बॉसचे भारतात अनेक प्रेक्षक आहेत. आणि कोट्यवधी प्रेक्षक हा कार्यक्रम पाहात असतात, असेही फिरोजिया यांचे म्हणणे आहे. समाजातील तरुण तसेच मुलांवर या कार्यक्रमाचा वाईट परिणाम होतो. हिंदी बिग बॉसचा सूत्रसंचालक अभिनेता सलमान खान याचे नाव घेऊन हा आणि अशाच प्रकारचे अन्य कार्यक्रम बंद करण्यात यावेत, अशी मागणी आपण करत असल्याचे फिरोजिया यांनी सांगितले.
 
या कार्यक्रमात सातत्याने शिवराळ भाषेचा वापर होतो तसेच वादविवाद दाखवले जातात. तसेच अनेकदा स्पर्धकांचे वैयक्तिक जीवन अत्यंत वाईट पद्धतीने समोर आणले जाते. अशाप्रकारचा कंटेंट असल्याने समाजावर याचा परिणाम होत असल्याचे ते म्हणाले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार