नवी दिल्ली: लोकसभेत वक्फ दुरुस्ती विधेयक बुधवारी दि. २ एप्रिल रोजी संमत झाले. विधेयकाच्या बाजूने २८८ तर विरोधात २३२ मते पडली. यानंतर गुरुवारी दि. ३ एप्रिल रोजी राज्यसभेत या विधेयकावर चर्चा सुरू करण्यात आली. तब्बल १२ तास झालेल्या या चर्चेनंतर शुक्रवारी दि. ४ एप्रिल रोजी मध्यरात्री २:३० वाजता सभापती जगदीप धनखड यांनी राज्यसभेतही वक्फ सुधारणा विधेयक मंजूर झाल्याची घोषणा केली.
राज्यसभेतील १२८ खासदारांनी वक्फ सुधारणा विधेयकाच्या बाजूने मतदान केले, तर ९५ खासदारांनी विरोधात मत दिले. या विधेयकामुळे राज्यसभेत पहाटे ४ वाजेपर्यंत कामकाज सुरू होते. वक्फ सुधारणा विधेयक मंजूर झाल्यानंतर मणिपूरमधील राष्ट्रपती राजवटीवर राज्यसभेत चर्चा करण्यात आली.