सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

कोणत्याही परिस्थितीत विशाळगडाचे पावित्र्य राखले जाईल; जिल्हाधिकारी अमोल येडगेंचे आश्वासन

उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पुरातत्व विभागाने विशाळ गडावरील अतिक्रमणांची सुनावणी घेऊन ती पूर्ण केली आहे.

Sudarshan MH
  • Jan 8 2025 11:45AM
कोल्हापूर: पोलिसांच्या अहवालानुसार काही निर्बंध घालून विशाळगड पर्यटक, भाविक यांच्यासाठी खुला करण्यात आला आहे. कोणत्याही परिस्थितीत विशाळगडाचे पावित्र्य राखले जाईल. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पुरातत्व विभागाने विशाळ गडावरील अतिक्रमणांची सुनावणी घेऊन ती पूर्ण केली आहे. अतिक्रमणधारकांचे म्हणणे विभागाने घेतले आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार पुरातत्व विभागाकडून कारवाई केली जाईल, असे जिल्हाधिकारी अमोल येडगे पत्रकारांना सांगितले आहे.
 
जिल्हाधिकारी अमोल येडगे म्हणाले, की ‘‘गडावर कोणताही कार्यक्रम संबंधित यंत्रणेची अनुमती घेऊनच करावा लागेल. विशाळगडावर प्रतिवर्षी उरूसाच्या संदर्भात आवेदन आले तर पोलीस यंत्रणेचा अहवाल घेऊन निर्णय घेतला जाईल. गडावरील समाधी, मंदिरांची दुरुस्ती, अन्य डागडुजी याच्या संदर्भात पुरातत्व विभागाचे काम चालू आहे. पुढील टप्प्याचा मसुदाही सादर केल्यावर त्याचेही काम चालू होईल.’’

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार