सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

कोपरगावात वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून कत्तलीसाठी डांबून ठेवण्यात आलेल्या गोवंशांची कोपरगाव शहर पोलिसांनी केली सुटका

कोपरगावातील वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या कारवाईत ५२५ किलो गोमांस व ३० जनावरांची कातडी व कत्तलीचे साहीत्य असा एकुण १ लाख ६८ हजार ३०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Sudarshan MH
  • Jan 19 2025 6:46PM
कोपरगाव: कोपरगाव शहरात विविध ठिकाणी छापे टाकून कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या गोवंश जनावरांची कोपरगाव शहर पोलिसांनी सुटका केली आहे. शहरातील आयशा कॉलनी, संजयनगर कोपरगाव शहर परिसरात विविध ठिकाणी छापे टाकून ६ गोवंश जनावरांची सुटका केली आहे. यांचबरोबर ५२५ किलो गोमांस व ३० जनावरांची कातडी व कत्तलीचे साहित्य असा एकूण १ लाख ६८ हजार ३०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला वेगवेगळ्या कलमान्वये एकूण पाच जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवार दि. 18 जानेवारी रोजी पोलीस निरीक्षक, भगवान मथुरे, कोपरगाव शहर पोलीस स्टेशन यांना गोपनीय बातमी मिळाली, की आयशा कॉलनी, कोपरगाव येथे गोवंश जनावरांची कत्तल होत आहे. तसेच कत्तलीसाठी जनावरे डांबून ठेवलेले आहे. अशी बातमी मिळाल्याने यांनी अधिनस्त अधिकारी सपोनि आशिष शेळके, सपोनि किशोर पवार, पोसई भुषण हांडोरे, पोहेको हांडोरे व अंमलदार पोहेको २५५० किशोर जाधव, पोहेको ११ एकनाथ लिंबोरे, पोहेकी ४६२ गोपीनाथ कांदळकर, पोहेकी १४४० दिगंबर शेलार, पोहेकॉ / २१८० दिपक रोकडे, पोना / २२४४ तुपे, पोको २५६३ गणेश काकडे, पोकों/२६३१ श्रीकांत कुन्हाडे, पोकों/२४३४ प्रकाश कुंढारे, पोकॉ/ २५७९ किशोर कुळधर, पोको १९१४ गणेश मैड, म. पोको १८२५ मंजुश्री त्रिभुवन, मपोकों/२४०० विजया दिवे अशांना पोलीस ठाण्यात बोलावून घेवून सांगितले, की गोपनीय बातमी मार्फत बातमी मिळाली, की आयशा कॉलनी, कोपरगाव येथे गोवंश जनावरांची कत्तल होत आहे.
 
तसेच जनावरे डांबून ठेवलेले आहे अशी माहीती मिळाली असून सदर ठिकाणी छापा टाकून खात्री करुन कायदेशीर कारवाई करायची असल्याने वरील अधिकारी व अंमलदार यांची पोनि भगवान मथुरे यांनी दोन पथक तयार करुन पथकासह आम्ही आयशा कॉलनी कोपरगाव येथे मिळालेल्या बातमीप्रमाणे खात्री केली असता महेबूब कॉलनी, संजयनगर कोपरगाव येथे 15000/-रु किचे गोवंश जातीचे 02 जनावरे कत्तलीचे उद्येश्याने बांधून ठेवलेले मिळून आले. सदरच्या जनावरांची लोकांच्या मदतीने सुटका करुन गोशाळेत जमा केले आहे.
 
सदर बाबत पोको 1914 गणेश मंड यांचे तक्रारीवरुन आरोपी तोहीद इरफान कुरेशी रा. संजयनगर, कोपरगाव यांचेविरुध्द कोपरगाव शहर पोस्टे गुरजि नंबर 17/2025 म. प्रा. स. अधि. 1976 चे कलम 5, 9 सह प्रा. निर्दयतेने वागविणेचा अधिनियम 1960 चे कलम 11 (1) (ड) सह म. पो. का. क. 119 प्रमाणे करण्यात आला आहे.
 
आयशाकॉलनी, संजयनगर नगर या ठिकाणी 60,000/ रुपये किचे 03 गोवंश जातीचे जनावरे कत्तलीच्या उद्देशाने बांधून ठेवलेले मिळून आल्याने सदरच्या जनावरांची लोकांच्या मदतीने सुटका करून गोशाळेत त्यांना जमा करण्यात आले आहे. सदर बाबत पोकों/2631 श्रीकांत बाळु कुन्हाडे यांचे तक्रारीवरुन आरोपी नामे सत्तार गफार कुरेशी रा. आयशा कॉलनी, संजयनगर, कोपरगाव याचेविरुध्द गु. रजि नंबर 18/2025 म.प्रा. स. अधि. 1976 चे कलम 5, 9 सह प्रा. निर्दयतेने वागविणेचा अधिनियम 1960 चे कलम 11 (1) (ड) सह म. पो. का. क. 119 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
 
त्यानंतर मिळालेल्या गोपनीय माहितीप्रमाणे, कत्तल होत असलेल्या ठिकाणी हाजी मंगल कार्यालयाच्या जवळ आयशा कॉलनी, कोपरगाव येथे जावून खात्री केली असता, पापा फकिरा महंमद कुरेशी रा. आयशा कॉलनी, संजयनगर, कोपरगाव याच्या पत्राच्या शेडमध्ये जनावरांची कत्तल केलेली होती. त्या ठिकाणी जनावरांचे ५० किलो मांस व २० कातडी, वजन काटा व कत्तलीसाठी लागणारे साहित्य असा एकूण १७,७००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आल्याने तो ताब्यात घेवून गोमांस व जनावरांच्या कातड्यांचे सॅम्पल घेवून कत्तलीचे साहित्य, बाकी गोमांस व कातडीची विल्हेवाट लावण्यासाठी नगरपालिका कोपरगाव यांच्या ताब्यात देवून त्याची विल्हेवाट लावली आहे.
 
सदर बाबत पोकों / २५६३ गणेश वशिष्ट काकडे यांचे फिर्यादीवरुन आरोपी पापा फकिरा महंमद कुरेशी रा. आयशा कॉलनी, संजयनगर, कोपरगाव याचे विरुध्द कोपरगाव शहर पोस्टे गु. रजि नंबर १९/२०२५ भा. न्या.सं. कलम ३२५, सह महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ चे कलम ५,९ सह म. पो. का. क. ११९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार