सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

भारतात हेरॉईनची तस्करी केल्याप्रकरणी पकडण्यात आलेल्या ८ पाकिस्तानींना १० वर्षांनी मिळाली २० वर्षांची शिक्षा

अरबी समुद्राच्या मार्गे भारतात हेरॉईनची तस्करी केल्याप्रकरणी पकडण्यात आलेल्या आठ पाकिस्तानी नागरिकांना विशेष एनडीपीएस न्यायालयाने दोषी ठरवले आहे.

Sudarshan MH
  • Jan 2 2025 5:19PM
मुंबई: अरबी समुद्राच्या मार्गे भारतात हेरॉईनची तस्करी केल्याप्रकरणी पकडण्यात आलेल्या ८ पाकिस्तानी नागरिकांना विशेष एनडीपीएस न्यायालयाने दोषी ठरवले आहे. याप्रकरणी पकडण्यात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांना १० वर्षानंतर २० वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.
 
विशेष न्यायाधीश शशिकांत बांगर यांनी सर्व दोषींना प्रत्येकी दोन लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे. हे प्रकरण २०१५ मधील आहे. कराचीतून भारतीय सागरी हद्दीत आलेल्या ‘अल यासिर’ जहाजाशी हे प्रकरण संबंधित आहे. २३२ किग्रॅ. हेरॉईनसह भारतीय तटरक्षक दलाने हे जहाज पकडले होते. या हेरॉईनची किंमत ६.९३कोटी असल्याचे सांगण्यात आले होते.
 
या प्रकरणी ८ जणांना अटक करण्यात आली होती. या आरोपींमध्ये अलीबख्शा सिंधी, मकसूद मासिम, मोहम्मद नाथो, मोहम्मद अहमद इनायत, मोहम्मद युसूफ गगवानी, मोहम्मद युनूस सिंधी, मोहम्मद गुलहसन सिंधी आणि गुलहसन सिद्दीक सिंधी यांचा समावेश आहे. हे सगळे आरोपी २०१५ पासून मुंबईच्या तुरुंगात आहेत. १८ ऑगस्ट २०२२ रोजी या प्रकरणाशी संबंधित ११ मोठे निळे प्लास्टिक ड्रम येलो गेट पोलीस स्टेशन येथून मुंबई सत्र न्यायालयात आणण्यात आले. २०१५ मध्ये याच ड्रममधून २३२ किलो हेरॉईनची तस्करी करण्यात आली होती.
 
भारतीय तटरक्षक दलाच्या ‘संग्राम’ या जहाजाचे तत्कालीन कमांडिंग ऑफिसरनी विशेष एनडीपीएस न्यायालयात उपस्थित राहून संपूर्ण घटना सांगितली. अल यासिर जहाज कशापद्धतीने पकडण्यात आले आणि जहाजावरील आरोपींना पकडण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. पाकिस्तानी जहाज अल यासिरवरून पकडण्यात आलेले कर्मचारीच न्यायालयात आरोपी म्हणून हजर असल्याचे त्यांनी सांगितले होते.
 
विशेष एनडीपीएस न्यायालयाने या सर्व आरोपींना एनडीपीएस कायद्या अंतर्गत दोषी ठरवत २० वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. या शिक्षेमुळे भारतात ड्रग्जची तस्करी करणाऱ्यांना थेट संदेश देण्यात आला आहे. भारतीय तटरक्षक दल तसेच अन्य सुरक्षा यंत्रणांच्या सतर्कतेचा हा परिणाम आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार