तुळजापूर: साडेतीन शक्तिपीठांपैकी एक आणि महाराष्ट्राची कुलदेवी असणार्या श्री तुळजाभवानी मंदिरातील गाभार्याच्या छताला आणि शिखराच्या खालील भागाला तडे गेले आहेत. गाभार्यातील ग्रॅनाईट काढल्यावर हा प्रकार उघडकीस आला आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी पहाणी केल्यावर गाभार्यातील दगड, शिळांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची सूचना त्यांनी दिली आहे.
शिळांना पडलेल्या या भेगा कुठपर्यंत आहेत? आणखी किती शिळांना भेगा आहेत? याची पहाणी करण्यासाठी पुरातत्व विभागातील तज्ञांना बोलावण्यात येणार आहे. मंदिरात सध्या पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली विकास कामे चालू आहेत. ज्या ठिकाणी दगडी बांधकाम आहे, ते त्याचप्रकारे रहावे, यासाठी पुरातत्व विभागाचे प्रयत्न आहेत.