वैजापूर: गेल्या आठवड्यापासून असलेल्या ढगाळ वातावरणामुळे कांदा उत्पादक शेतकरी त्रस्त झाले आहेत. ढगाळ वातावरणामुळे कांद्यावर करप्या रोगाचा प्रादुर्भाव जाणवत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणीकांदा पूर्णपणे पांढरा पडला आहे. रोग आटोक्यात आणण्यासाठी महागड्या औषधाची फवारणीकरुन शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. वैजापूर तालुक्यात १९ हजार हेक्टर कांदा पिकाची लागवड करण्यात आली. ढगाळ हवामानामुळे कांदा वअन्य पिकांच्या वाढीवर मोठा परिणाम होत आहे.
ढगाळ वातावरणामुळे यावर्षीही पुन्हा शेतकऱ्यांवर संकट आले आहे. या हवामानामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणातघट होणार असल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत. यावर्षी भरपूर पाणी असल्याने शेतकरी कांदा पिकाकडे वळला आहे. कांदामोठ्या प्रमाणात घेतला जात असताना यापिकावर ढगाळ हवामानाचा परिणाम होत आहे.
वाढत्या धुक्यामुळे कांद्याचे पीक जाण्याच्या मार्गावर आहे. कांद्यावरील मर रोग, करपा व माव्यामुळे रासायनिक औषधेफवारणी करण्यासाठी एकरी दोन ते तीन हजार रुपये एका फवारणीला खर्च येतो. त्यामुळे रासायनिक औषधांच्या दुकानांमध्ये गर्दी होत आहे.