सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांनी दिले दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाची चौकशी करून कारवाईचे आदेश

घडलेल्या घटनेबद्दल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. चौकशी समितीचा जो अहवाल येईल, त्या अहवालाच्या आधारे सदर रूग्णालयावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आबिटकर यांनी म्हटले आहे.

Sudarshan MH
  • Apr 5 2025 9:55AM

पुणे: पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात दाखल न करून घेतल्याने तनिषा भिसे, या महिलेचा मृत्यू झाला आहे. १० लाख रूपये भरा मगच रूग्णालयात दाखल करून घेऊ, अशी भूमिका प्रशासनाने घेतल्याने महिलेचा हाकनाक बळी गेला आहे. यानंतर राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांकडून रूग्णालयाविरोधात आक्रमक झाले आहेत. रूग्णालयाच्या बोर्डाला काळे फासण्यात आले. रूग्णालयातील कर्मचाऱ्यांवर चिल्लर फेकण्यात आली. त्यामुळे रूग्णालयाबाहेर मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यातच आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी आपली भूमिका मांडली आहे.

घडलेल्या घटनेबद्दल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. चौकशी समितीचा जो अहवाल येईल, त्या अहवालाच्या आधारे सदर रूग्णालयावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आबिटकर यांनी म्हटले आहे.

प्रकाश आबिटकर म्हणाले, की “अधिकचे पैसे न भरल्याने पुण्यातील मंगेशकर रूग्णालयात एका महिलेला उपचार नाकारण्यात आले. यामुळे सदर महिलेचा जीव गेला आहे. ही अस्वस्थ करणारी आणि मन सुन्न करणारी घटना आहे. या घटनेबद्दल एका समितीला सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. चौकशी समितीच्या माध्यमातून रूग्णाच्या कुटुंबीयांचे म्हणणे ऐकू घेतले जाईल. त्यानंतर चौकशी समितीच्या अहवालाच्या आधारे रूग्णालयावर कायदेशीर कारवाई केली जाईल.”

“मंगेशकर रूग्णालयाची नोंदणी ट्रस्ट अ‍ॅक्टखाली आहे. शासनाच्या विविध योजनांचा आणि सुविधांचा लाभ रूग्णालयाला दिला जातो. असे असताना रूग्णालयाकडून रूग्णाला दाखल करून घेण्याआधीच पैशांची मागणी करण्यात आली असेल आणि काही चुकीचा प्रकार घडला असेल, तर मंगेशकर रूग्णालयात शासनाच्या वतीने कठोर कारवाई आपण करणार आहोत,” असे आबिटकर यांनी म्हटले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार