सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

व्यापाऱ्यांकडून पैसे उकळणाऱ्यांवर खंडणीचे गुन्हे दाखल करण्याची भाजप व्यापारी आघाडीची मागणी

या विषयात पोलिसांनी लक्ष घालावे आणि कडक कारवाई करून त्यांच्या वर खंडणीचे गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडी, पुणे शहर यांच्यावतीने करण्यात आली आहे.

Sudarshan MH
  • Apr 3 2025 6:17PM
पुणे: शहरातील व्यापाऱ्यांना असामाजिक तत्वे, गुंड, स्थानिक मंडळ व कामगार संघटना यांच्याकडून वेगवेगळ्या प्रसंगी वर्गणी, व युनियनच्या नावाखाली बळजबरीने पैशांची मागणी करण्यात येत आहे. या विषयात पोलिसांनी लक्ष घालावे आणि  कडक कारवाई करून त्यांच्या वर खंडणीचे गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडी, पुणे शहर यांच्यावतीने करण्यात आली आहे. 
 
भाजप व्यापारी आघाडीच्या वतीने उमेश शाह यांच्या नेतृत्वाखाली सरचिटणीस महेश गुप्ता, उपाध्यक्ष विक्रम चव्हाण, अभिजीत भोसले यांनी पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे या संबंधीचे निवेदन दिले आहे.  
 
या निवेदनात म्हंटले आहे की,  देशाची अर्थ व्यवस्था सुरळीत चालवण्या मध्ये व्यापारी वर्गाचा मोठा वाटा आहे परंतु वरील नमुद केले प्रमाणे व्यापारी वर्ग ह्या असामाजिक तत्वे/गुंड व कामगार संघटना यांचा दबावाखाली मोठी रक्कम त्यांना देण्यास भाग पडतात. आम्ही भारतीय जनता पार्टी, व्यापारी आघाडी पुणे शहर तर्फे आपणास नम्र विनंती करतो की, आपण वरील नमुद केले प्रमाणे असामाजिक तत्वे, गुंड यांचा विरोधात कडक कारवाई करून त्यांच्या वर खंडणीचे गुन्हे दाखल करावे. पोलीस - व्यापारी वर्ग यांच्या मधील संबंध मजबूत करण्यासाठी, संबंधित सर्व पोलिस स्टेशन व वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना आप-आपल्या अधिकार क्षेत्रात असणाऱ्या असामाजिक तत्वे, गुंड यांना समज द्यावी अशी नम्र विनंती करतो.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार