शिर्डी: सध्या शिर्डीमध्ये एकीकडे रामनवमीच्या उत्सवाला मोठ्या धुमधडाक्यात सुरुवात झाली आहे. तर दुसरीकडे शिर्डीत दोघांची निर्घुण हत्या करण्यात आली आहे. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. शिर्डी विमानतळाजवळील काकडी शिवारातील गुंजाळ वस्तीवर ही धक्कादायक घटना घडली आहे. दरोड्याच्या उद्देशाने हल्ला करत हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शिर्डी विमानतळाजवळील काकडी शिवारातील गुंजाळवस्ती येथे दोघांची निघृण हत्या तर एक जण गंभीर जखमी आहे. दरोड्याच्या उद्देशाने हल्ला करत हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. आज पहाटेच्या सुमारास ही घटना घडली आहे. दोघांच्या हत्येमुळे शिर्डीत एकच खळबळ उडाली आहे.
मृतात वडील व मुलाचा समावेश आहे तर आई गंभीर जखमी झाली आहे. साहेबराव भोसले (६०) व कृष्णा भोसले (३०) अशी मृतांची नावे आहेत. तर घरातील सामानाची उचकापाचक झाल्याचे देखील समजते. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.