सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

खोट्या फॉलोअर्सवर मुंबई पोलिसांची नजर पडली असून सोशल मिडियावर खोट्या फॉलोअर्ससंदर्भातील तपास पोलिसांनी सुरु

वृत्तसंस्थेने दिली अनिल देशमुख यांच्या वक्तव्यासंदर्भातील माहिती

Aishwarya Dubey
  • Jul 24 2020 6:52PM

सोशल मिडियावर आपले फॉलोअर्स किती आहेत हे आता अनेकांना खूप महत्वाचं वाटतं. या फॉलोअर्सच्या संख्येवरुन एखाद्या व्यक्तीला महत्व प्राप्त होतं असल्याने आता फॉलोअर्स वाढवण्यासंबंधितील काळाबाजार होऊ लागल्याचा धक्कादायक ट्रेण्ड दिसून येत आहे. अनेक सेलिब्रिटींनाही त्यांच्या फॉलोअर्सची संख्या ही खूप महत्वाची वाटते. जितके अधिक फॉलोअर्स तितकी जास्त किंमत असं गणित या डिजीटल जगातील लोकप्रियतेसाठी मांडलं जातं. मात्र आता या अशा खोट्या फॉलोअर्सवर मुंबई पोलिसांची नजर पडली असून सोशल मिडियावर खोट्या फॉलोअर्ससंदर्भातील तपास पोलिसांनी सुरु केला आहे. यासंदर्भातील बातमी काही दिवसांपूर्वीच समोर आल्यानंतर आता राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याच प्रकरणी महत्वाची माहिती दिली आहे. खोट्या फॉलोअर्स प्रकरणी चौकशी केली जाणार असल्याचे गृहमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.

“अशा काही पीआर एजन्सी आहेत ज्या खोटे फॉलोअर्स पुरवतात. अगदी बॉलिवूडमधील कलाकारांनाही खोटे फॉलोअर्स पुरवले जातात. हे फॉलोअर्स केवळ लोकप्रियता वाढवण्यासाठी वापरले जात नाहीत तर ते ट्रोलिंग आणि एकाद्याची माहिती चोरण्यासाठीही वापरले जातात. त्यामुळेच राज्याचं पोलीस खातं या प्रकरणाची चौकशी करणार आहे,” असं देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनं यासंदर्भात ट्विट केलं आहे.

काय आहे प्रकरण?

फेक फॉलोअर्सला इन्स्ताग्रामच्या भाषेत ‘बोट्स’ असं म्हटलं जातं. याच ‘बोट्स’च्या मदतीने अनेक कलाकार आणि प्रभावशाली व्यक्ती आपल्या फॉलोअर्सची संख्या फुगवून दाखवतात. हे बोट्स विकत घेतलेले असतात. म्हणजेच पैसे देऊन फॉलोअर्सची संख्या वाढवता येते. ही माहिती समोर आल्यानंतर आता या चौकशीचा भाग म्हणून मुंबई पोलीस लवकरच अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि दीपिका पदुकोणबरोबरच इतर सेलिब्रिटींची चौकशी करणार असल्याचे वृत्त डीएनए या वेबसाईटने काही दिवसांपूर्वीच दिलं आहे. येणाऱ्या काही आठवड्यांमध्ये मुंबई पोलिसांचे विशेष पथक या अभिनेत्रींबरोबरच इतर सेलिब्रिटींची चौकशी करणार असल्याचे या वृत्तामध्ये म्हटलं आहे. खोट्या फॉलोअर्ससंदर्भातील या तपासादरम्यान दीडशे लोकांचा जबाब नोंदवला जाण्याची शक्यता आहे. मुंबई पोलिसांनी फेक फॉलोअर्स असणाऱ्या व्यक्तींची यादीच तयार केली आहे. या यादीमध्ये बॉलिवूडमधील सेलिब्रिटींबरोबरच अनेक खेळाडू, बिल्डर आणि हाय प्रोफाइल व्यक्तींची नावं असल्याचं सांगण्यात येत आहे.

मुंबई पोलीस या चौकशीदरम्यान सेलिब्रिटींकडे त्यांच्या फॉलोअर्सच्या संख्येसंदर्भात प्रश्न विचारु शकतात. सर्व फॉलोअर्स हे खरे असून फॉलोअर्सचा आकडा फुगवून सांगण्यासाठी कोणत्याही कंपनीची किंवा चुकीच्या पद्धतीचा वापर केला नाही हे सेलिब्रिटींना पोलिसांना पटवून द्यावे लागणार आहे. या फेक फॉलोअर प्रकरणात आतापर्यंत १८ लोकांची चौकशी झाली आहे. पोलिसांनी या व्यक्तींची चौकशी केली आहे ते सर्वजण हे छोट्या पडद्याशी म्हणजेच मालिका आणि टीव्हीवरील मनोरंजन क्षेत्राशी संबंधित आहेत. यामध्ये कलाकारांबरोबरच निर्माते, निर्देशक, मेकअप आर्टीस्ट, कोरियोग्राफर आणि सहाय्यक दिग्दर्शकांचा समावेश आहे. फेक फॉलोअर्स संदंर्भात भारतामध्ये अशाप्रकारे पहिल्यांदाच चौकशी केली जात आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार