सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

महाराष्ट्र घुसखोर मुक्त करण्यासाठी ‘जनता एन्.आर्.सी. मोहीम’

‘www.JananNRC.org’ या संकेतस्थळावर या अभियानाची माहिती देण्यात आली आहे.

Sudarshan MH
  • Oct 18 2024 9:24AM

येवला: भारतात अनुमाने १० कोटीहून अधिक रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोर आहेत. महाराष्ट्रात त्यातील १ कोटी घुसखोर आहेत. मुंबईमध्ये यांतील ४० लाख घुसखोर आहेत. हे सर्व घुसखोर देशविघातक कृत्यांमध्ये सहभागी आहेत. या घुसखोरांना बाहेर काढण्यासाठी महाराष्ट्रात ‘जनता एन्.आर्.सी.’ (जनता राष्ट्रीय नागरिक नोंदणी) अभियान राबवले जाणार आहेत. या अभियानाच्या अंतर्गत घुसखोरांचा शोध घेण्यासाठी महाराष्ट्रातील साडेपाच लाख कार्यकर्ते मैदानात उतरणार आहेत, अशी माहिती सुदर्शन वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक श्री. सुरेश चव्हाणके यांनी केले. या अभियानाची माहिती देण्यासाठी आज येवला येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात धर्मयोद्धा श्री. सुरेश चव्हाणके यांनी ही माहिती दिली. कार्यक्रमासाठी समाजातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उपस्थित राहून या अभियानाला पाठिंबा दर्शवला.

या वेळी श्री. सुरेश चव्हाणके म्हणाले, "महाराष्ट्रातील सर्व अनधिकृत घुसखोरांनी राज्य सोडून निघून जावे. प्रत्येक जिल्ह्यात राष्ट्रीय नागरिक नोंदणीची समिती सिद्ध आहे. विषयी प्रत्येक जिल्ह्यात कार्यशाळा घेण्यात आल्या आहेत. पश्चिम बंगालचे असल्याचे सांगून बांगलादेशी घुसखोर महाराष्ट्रात रहात आहेत."

नागरिकांना आवाहन करून आपल्या आजूबाजूच्या परिसरात घुसखोर आहेत का? हे पाहिले जाईल. शहरातील वार्ड आणि ग्रामीण भागात ग्रामपंचायत यांच्याशी संपर्क करून आपल्या भागात घुसखोर आहेत का? याचा शोध घेतला जाईल. या अभियानासाठी आम्ही आतापर्यंत १८ सहस्र ५०० ग्रामपंचायती आणि ४४ सहस्र गावांना भेट दिली आहे. यामध्ये धार्मिक, सामाजिक आदी विविध क्षेत्रांतील लोक कार्यरत आहेत. राजकीय नव्हे, तर राष्ट्रहिताच्या दृष्टीने हा विषय पहायला हवा, असे श्री. सुरेश चव्हाणके यांनी म्हटले.

जनता NRC ची मोहीम कशी राबवली जाणार?

प्रथम क्षेत्र निश्चित केले जाणार. त्यानंतर कार्यकर्त्यांचा संघ आणि वर्गवारी केली जाणार. त्यानंतर घुसखोरांनी स्वत: पुढे यावे, यासाठी आवाहन केले जाणार. त्यानंतर शोधमोहीम राबवली जाईल. शोध लागलेली व्यक्ती घुसखोरच आहे ना ? याची खात्री केली जाईल आणि त्यानंतर त्यांना देशाबाहेर घालण्यासाठी सरकारवर दबाव आणला जाईल. अशी ६ टप्प्यांमध्ये मोहीम राबवली जाईल, असे श्री. सुरेश चव्हाणके यांनी सांगितले.

तीन - चरण ब्लूप्रिंट...

पहिला टप्पा -
जनजागृती...


या मोहिमेबाबत लोकांमध्ये जनजागृती होणे गरजेचे आहे. यासाठी संवाद साधणे, कार्यशाळा आयोजित करणे आणि स्थानिक समुदायांपर्यंत माहिती पोहोचवणे महत्त्वाचे आहे.

दुसरा टप्पा -
कार्यकर्त्यांची टीम तयार करणे...


सक्षम कार्यकर्त्यांची एक मजबूत टीम तयार करावी लागेल, जी जनजागृतीसाठी मदत करेल आणि या समस्येवर काम करणाऱ्या संस्थांना सहकार्य करेल.

तिसरी पायरी -
सरकारवर दबाव आणणे...


शोध आणि शोध घेण्यासाठी सरकारवर दबाव आणण्यासाठी विविध माध्यमांचा वापर करून अहवाल प्रणाली विकसित करणे आवश्यक आहे. हे समस्येचे योग्य निराकरण करण्यात मदत करेल.

संपर्क करा, आंदोलनात सहभागी व्हा ! (चौकट)
‘www.JananNRC.org’ या संकेतस्थळावर या अभियानाची माहिती देण्यात आली आहे. या अभियानात सहभागी होण्यासाठी आणि पाठींबा देण्यासाठी ९२०९४२०४२०४ या क्रमांकावर संपर्क करा, असे आवाहन श्री. सुरेश चव्हाणके यांनी केले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार