सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

बीड जिल्ह्यात १२८१ पिस्तूल परवानाधारक; २४५ परवानाधारकांवर गुन्हे दाखल असूनही त्यांच्याकडे आहे शस्त्र परवाना!

बीड जिल्ह्यातील १२८१ पिस्तूल परवानाधारकापैकी २४५ जणांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत. मात्र तरीही त्यांच्याकडं शस्त्र परवाना आहे.

Sudarshan MH
  • Dec 26 2024 8:39AM

बीड: गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्ह्यात दहशतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. त्याच अनुषंगाने बीड जिल्ह्यात पोलीस प्रशासन पिस्तूल बाळगणाऱ्या नागरिकांवर कारवाई करत आहे. जिल्ह्यात १२८१ पिस्तूलधारक आहेत. त्यामुळं बीड जिल्ह्यात सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे.

बीड जिल्ह्यात ज्याच्या नावे लायसेन्स आहे ते नागरिक पिस्तूल वापरत नाहीत, तर त्यांच्या घरातील तरुण या पिस्तूलचा वापर करत असल्याचं पाहायला मिळत आहे. काही तरुणांचे हवेत गोळीबार करतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर देखील व्हायरल झाले आहेत. यामुळं बीड जिल्ह्यात दहशतीचं वातावरण पाहायला मिळत आहे. मात्र परवानाधारकांची संख्या जरी १२८१ असली तरी, अवैध विनापरवाना किती पिस्तूल असतील याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.
 
मस्साजोग येथील झालेल्या घटनेमुळं बीड जिल्ह्यात अशांतता आहे. सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणात दररोज वेगवेगळे पुरावे सापडत आहेत. या प्रकरणामुळं पूर्वीचे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. तर नवनीत कॉवत हे आता बीड जिल्ह्याचे नवीन पोलीस अधीक्षक आहेत. कॉवत हे एक धडाकेबाज पोलीस अधिकारी असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळं परवानाधारक पिस्तूल बाळगणाऱ्या नागरिकांवर आणि विनापरवाना पिस्तूल वापरणाऱ्या नागरिकांना कसा धाक बसतो, याकडं आता सर्व जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे.
 
बीड जिल्ह्यातील १२८१ पिस्तूल परवानाधारकापैकी २४५ जणांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत. मात्र तरीही त्यांच्याकडं शस्त्र परवाना आहे. गुन्हे नोंद असलेल्यांचा परवाना रद्द करावा यासाठी पोलीस प्रशासनाने गेल्या काही दिवसापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांकडं प्रस्ताव पाठवलेला होता. यावर अद्याप कारवाई झालेली नाही.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार