सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

फडणवीस यांचे कर्तृत्व महाराष्ट्रात परिवर्तन घडवेल; नितीन गडकरी यांनी व्यक्त केला विश्वास

मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री बावनकुळे यांच्यासह आमदारांचा सत्कार...

Sudarshan MH
  • Dec 25 2024 9:18PM
नागपूर: महाराष्ट्राच्या जनतेने आपल्या पक्षाला मोठे यश दिले. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले पाहिजेत, असे प्रत्येकाच्या मनात होते. कारण देवेंद्र यांचे कर्तृत्व, नेतृत्व लोकांनी बघितले आहे. ते दोन वेळा महापौर होते. नगरसेवक, आमदार, मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, उपमुख्यमंत्री असा मोठा प्रवास त्यांनी केला. आता पुन्हा ते मुख्यमंत्री झाले आहेत. देवेंद्र यांचे कर्तृत्व महाराष्ट्रात परिवर्तन घडवल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे हे नागपूरचे भूमिपुत्र आहेत आणि ते महाराष्ट्राचे नेतृत्व करीत आहेत, याचा मला मनस्वी आनंद आहे, अशी भावनाही ना. श्री. गडकरी यांनी व्यक्त केली.
 
विधानसभा निवडणुकीत विजय संपादन करणाऱ्या भाजपच्या विदर्भातील आमदारांचा ना. श्री. नितीन गडकरी यांच्या हस्ते झाला. भारतीय जनता पार्टी नागपूर महानगर व जिल्हा यांच्या वतीने क्रीडा चौकातील ईश्वर देशमुख कॉलेजच्या मैदानावर हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, माजी खासदार अजय संचेती, माजी खासदार डॉ. विकास महात्मे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
 
आजच्या कार्यक्रमासाठी अटलजींच्या जन्मशताब्दीचा दिवस निवडला याचा आनंद आहे. त्यांचे जीवन आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. भारतीय जनता पार्टीची १९८० मध्ये स्थापना झाली. न्यू इंग्लिश हायस्कूलमध्ये पक्षाच्या स्थापनेसाठी राम जेठमलानी व शांतीभूषण नागपूरला आले होते. त्यानंतर लोकसभा निवडणुकीत आपला दारूण पराभव झाला. ‘पर्याय पर्याय म्हणून ओरडतात कोण… ज्यांचे निवडून आले दोन!’ अशी आपली थट्टा झाली. पण अटलजी थांबले नाहीत. त्यांनी राष्ट्रवादाचा मूलमंत्र आपल्याला दिला. ‘हम दो चार रहे न रहे… तेरा वैभव अमर रहे माँ’, हा मंत्र त्यांनी आपल्याला दिला. हा इतिहास भविष्याचा वेध घेण्याची प्रेरणा देतो. हिंदू, हिंदुत्व, हिंदू जीवन पद्धतींबद्दल गैरसमज आहेत. पण भारतीयत्व हेच हिंदूत्व आहे आणि हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व आहे, हा विचार अटलजींनी दिला, या शब्दांत ना. श्री. गडकरी यांनी भारतरत्न अटलजींच्या आठवणींना उजाळा दिला. 
 
प्रसिद्ध कवी-गीतकार जावेद अख्तर यांनी एकदा अटलजींची मुलाखत घेतली होती. त्यांनी अटलजींना विचारले होते की, ‘हा देश सेक्युलर आहे का?’. त्यावर अटलजी म्हणाले होते, ‘हा देश सेक्युलर आहे, राहील. पण तो काँग्रेस किंवा भाजपमुळे नाही, तर भारतातील हिंदू समाजामुळे आहे.’ प्रत्येक धर्माच्या बाबतीत आमच्या मनात आदर आहे. जातीय विचारांना थारा देणे योग्य नसल्याचा संदेश अटलजींनी या देशाला दिला. त्यांचाच विचार घेऊन आपल्याला पुढे जायचे आहे, असे आवाहन ना. श्री. गडकरी यांनी कार्यकर्त्यांना दिला.
 
*‘आता मोठी जबाबदारी’*
 
‘छोडो कल की बाते, कल की बात पुरानी… नए दौर से लिखेंगे मिलकर नयी कहानी… हम हिंदुस्तानी’ असं हिंदी गाणं आहे. इतिहास लक्षात ठेवा. पण, आता जबाबदारी मोठी आहे. आता इतिहास घडवायचा आहे. महाराष्ट्रातील शेतकरी, दलित-पीडित-शोषित, आदिवासी आणि कष्टकरी- मजुरांचे जीवन सुसह्य करायचे आहे. तरुणांना रोजगार द्यायचा आहे. याचे आव्हान आता देवेंद्र आणि त्यांच्या टीमपुढे आहे, असेही ना. श्री. गडकरी म्हणाले. 
 
*‘देवेंद्र पक्षाच्या परंपरेतील नेते’*
 
फडणवीस यांना आमदार किंवा नगरसेवक करा, असे त्यांच्या वडिलांनी म्हटले नाही. पक्षाने ठरवले म्हणून मी देवेंद्र यांना निवडणूक लढण्यास सांगितले. ज्या मुलांसाठी त्यांचे आई-वडील आग्रह करतात, त्यांना कधीही तिकीट देऊ नये, असा माझा कायम आग्रह असतो. भाजप ही कुणाच्या आई-वडिलांची प्रायव्हेट पार्टी नाही. ही कार्यकर्त्यांची पार्टी आहे. या पक्षाच्या परंपरेतून देवेंद्र पुढे आले आहेत, असेही ना. श्री. गडकरी म्हणाले. 
 
*घरच्या लोकांनी केलेले कौतुक - मुख्यमंत्री श्री. फडणवीस*
 
आजचा सत्कार स्वीकारताना दोन भावना मनात होत्या. ज्यांच्याकडे बघून राजकारण करतो, ते श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दीच्या दिवशी सत्कार होतोय. त्यासोबतच राजकारणात ज्यांचे मार्गदर्शन अत्यंत मोलाचे ठरले, त्या मा. नितीनजींच्या हस्ते सत्कार होतोय. त्यामुळे माझ्यासाठी हा सत्कार नव्हता तर कौतुक होते. घरच्या मोठ्या माणसाने कौतुक केले तर ते स्वीकारलेच पाहिजे, या शब्दांत मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी सत्काराला उत्तर दिले. 
 
*‘नितीनजींनी लढायला सांगितले’*
 
नितीनजींनी मला बोलावले. त्यावेळी प्रभाकरराव दटके, दिवाकरराव धाक्रस सोबत होते. त्यांनी मला महापालिकेची निवडणूक लढायला सांगितले. वॉर्ड क्रमांक ६९ मधून लढण्याची तयारी केली. १९९२ मध्ये निवडणूक झाली आणि पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आलो. तेव्हापासून राजकीय कारकीर्द सुरू झाली. अतिशय वेगाने ही वाटचाल झाली, याचाही श्री. फडणवीस यांनी उल्लेख केला. 
 
*‘नितीनजींनी निवडणूक अंगावर घेतली’*
 
विधानसभा निवडणूक जाहीर झाली. लोकसभेतील अपयश पुसून काढायचे होते. ज्येष्ठ नेत्यांच्या आशीर्वादाने आम्ही सगळे मैदानात उतरलो. त्यावेळी नितीनजींनी अख्खी निवडणूक अंगावर घेतली. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सभा घेऊन कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण केला. प्रचाराला दिशा देण्याचे काम केले. आता विजयामुळे आपली जबाबदारी वाढली आहे. आमचे वरिष्ठ नेते हिमालयासारखे आमच्या पाठिशी उभे आहेत. त्यांच्या आणि जनतेच्या अपेक्षांना खरे उतरू, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
 
मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह मंत्री, आमदारांचा सत्कार...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, कामगार मंत्री आकाश फुंडकर, गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांच्यासह रणधीर सावरकर, चैनसुख संचेती, संजय कुटे, श्याम खोडे, सईताई डहाके, प्रताप अडसड, राजेश वानखेडे, केवलराम काळे, प्रवीण तायडे, उमेश यावलकर, राजू तोडसाम, सुमित वानखेडे, राजेश बकाणे, समीर कुणावार, देवराव भोंगळे, किशोर जोरगेवार, बंटी भांगडिया, मिलिंद नरोटे, विजय रहांगडाले, संजय पुराम, मोहन मते, कृष्णा खोपडे, प्रवीण दटके, चरणसिंग ठाकूर, आशीष देशमुख, समीर मेघे यांच्यासह विदर्भातील आमदारांचा ना. श्री. नितीन गडकरी यांच्या हस्ते सत्कार झाला. यावेळी राज्यसभा सदस्य डॉ. अनिल बोंडे यांचाही सत्कार करण्यात आला.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार