शिर्डी: विधानसभा निवडणुकीतील ऐतिहासिक महाविजयानंतर पहिल्यांदाच पक्षाचे राज्यव्यापी अधिवेशन पार पडले आहे. भाजपचं महाअधिवेशन आज शिर्डी येथे पार पडले. यासाठी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्यासह राज्यातील सर्वच प्रमुख नेते व पदाधिकारी सहभागी झाले होते. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि केंद्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश यांनी पदाधिकाऱ्यांना मार्दर्शन केलं. यावेळी चंद्रशखेर बावनकुळे यांनी भाजपच्या मंत्र्यांनी महिन्यातून एकदा खेड्यात मुक्कामी राहावं, अशा सूचना दिल्या आहेत.
भाजपच्या प्रदेश अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या या बैठकीत प्रदेश कार्यकारिणीचे पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, विविध आघाड्यांचे अध्यक्ष उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष बावनकुळे तसेच केंद्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश यांनी मार्गदर्शन केले राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यावेळी उपस्थित होते. खेड्यातील माणसांच्या समस्या समजून घ्यायच्या असतील तर पक्षाच्या मंत्र्यांना खेड्यात जावेच लागेल, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
भाजपच्या मंत्र्यांना महिन्यातून किमान एकदा खेड्यात मुक्कामी राहावं लागणार आहे. यामुळं कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची मंत्र्यांकडची कामे मार्गी लागण्यास यामुळं मदत होईल. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रदेश पदाधिकाऱ्यांच्या तसेच जिल्हाध्यक्षांच्या बैठकीत सूचना दिल्या. भारतीय जनता पक्षाच्या सर्व मंत्र्यांना आता महिन्यातून किमान एकदा एका खेड्यात जाऊन मुक्काम करावा लागणार आहे.