सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

शिवसेनाप्रमुख स्मारक समितीतून उद्धव यांची हकालपट्टी करा; शिंदेसेनेचा ठराव

२३ तारखेला मुंबईच्या बीकेसीमध्ये भव्य मेळावा पार पडणार आहे. त्या मेळाव्यात शिवसेनेचे सर्व आमदार आणि खासदार यांचा भव्य सत्कार केला जाईल.

Sudarshan MH
  • Jan 14 2025 8:39AM

मुंबई: काल मुंबईमध्ये शिवसेना पक्षातील नेते आणि उपनेते यांची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीला लोकसभेतील शिवसेना गटनेते खा. श्रीकांत शिंदे आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते, खासदार तसेच अन्य नेते उपस्थित होते. दरम्यान, बैठकीत संघटनात्मक आणि आगामी मुंबई महानगरपालिका निवडणूकीबाबत सुद्धा चर्चा झाली. २३ तारखेला मुंबईच्या बीकेसीमध्ये भव्य मेळावा पार पडणार आहे. त्या मेळाव्यात शिवसेनेचे सर्व आमदार आणि खासदार यांचा भव्य सत्कार केला जाईल. तसेच मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्याहस्ते सत्कार सुद्धा करण्यात येणार आहे. २३ तारखेला बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त हा मेळावा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती रामदास कदम यांनी दिली. या बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

यावेळी बोलतांना रामदास कदम म्हणाले, की "बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा पहिला टप्पा पूर्ण होत आहे. शिवसेनेच्या विचारधारेला काळीमा फासण्याचं काम उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. आम्ही ४५ वर्ष मातोश्री जवळून पाहिली आहे. ज्यांनी शिवसेनाप्रमुखांच्या विचाराला हरताळ फासली, लाचारी पत्करून उद्धव ठाकरे हे काँग्रेस सोबत गेले. त्या उद्धव ठाकरे यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या अध्यक्षपदी राहण्याचा अजिबात अधिकार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ शासन म्हणून उद्धव ठाकरे यांची अध्यक्षपदावरून हकालपट्टी करावी", असा ठराव आज बैठकीत मंजूर केला आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार