खामगाव: महाराष्ट्रातून घुसखोरांना बाहेर काढण्यासाठी दि. ७ नोव्हेंबर ते १८ नोव्हेंबरपर्यंत धर्मयोद्धा डॉ. श्री. सुरेश चव्हाणके यांच्या नेतृत्वाखाली भव्य शिवप्रेरणा यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. आज दि. ९ नोव्हेंबर रोजी खामगाव येथे श्री. सुरेश चव्हाणके यांचे राष्ट्रहितासाठी मतदान जनजागृतीपर व्याख्यान आयोजित करण्यात आलेले होते. यावेळी जळगाव मधील वेगवेगळ्या हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते. सकल हिंदू समाजाच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी बोलतांना डॉ. श्री. सुरेश चव्हाणके म्हणाले, की देशहितासाठी, राष्ट्रीय सुरक्षेसाठी १०० टक्के मतदान करा. जाती - जातीत, भाषा, प्रांत यांत विभागले जाऊ नका. हिंदू म्हणून एक या. मी कोणत्याही पक्षाला मतदान करा असे सांगत नाही, फक्त हिंदू म्हणून मतदान करा. निवडणुकीसाठी उभे राहिलेल्या उमेदवाराला लव्ह जिहाद, भूमी जिहाद, गो - हत्या बंदी यावर प्रशासनाचे लक्ष वेधण्यास सांगावे. तसेच उपस्थित हिंदूंच्या सोबत व्होट जिहाद संदर्भात शपथ घेण्यात आली.
जो गाय वाचवायला मदत करणार नसल्याचे वचन देणार नाही त्याला मतदान करू नका, मग तो कोणत्याही पक्षाचा असो तरीही त्याला मतदान करू नका. आम्ही कोणत्याही पक्षाचे गुलाम नाही. मुस्लिम व्होट जिहाद करत असतील, तर हिंदूंनीही मतदानाचं धर्मयुद्ध लढलं पाहिजे. इस्लाम मजहब आहे, धर्म तर फक्त सनातन हिंदू आहे, असंही यावेळी बोलतांना डॉ. श्री. सुरेश चव्हाणके म्हणाले.
तसेच या शिव प्रेरणा यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील १ कोटी घुसखोरांवर कारवाईची मागणी केली जाणार आहे, ज्यामुळे राज्य सुरक्षित, स्थिर आणि संपन्न होईल. महाराष्ट्रात सध्या बांग्लादेशी, रोहिंग्या आणि पाकिस्तानी घुसखोरांची संख्या चिंताजनक आहे. त्यांना बाहेर काढल्यास चाळीस लाख रोजगाराच्या संधी आणि १२ लाख घरे मराठी जनतेसाठी उपलब्ध होतील. यामुळे गुन्हेगारी कमी होऊन राज्यावरचा आर्थिक ताणही कमी होईल. जनता NRC चळवळ घुसखोरांमुळे निर्माण झालेल्या आर्थिक, सामाजिक, आणि सांस्कृतिक समस्यांना सोडवण्यासाठी समर्पित आहे.
‘www.JananNRC.org’ या संकेतस्थळावर या अभियानाची माहिती देण्यात आली आहे. या अभियानात सहभागी होण्यासाठी आणि पाठींबा देण्यासाठी ९२०९४२०४२०४ या क्रमांकावर संपर्क करा.