सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

भाव कोसळल्यामुळे लासलगावला शेतकऱ्यांनी कांदा लिलाव पाडले बंद

खरीप हंगामात लाल कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर झाल्याने काही दिवसांपासून कांद्याचे दर प्रतिक्विंटल ३००० ते ३५०० रुपयांनी घसरले आहेत.

Sudarshan MH
  • Jan 15 2025 10:40AM

लासलगाव: लासलगाव बाजार समितीत सोमवारी सकाळच्या सत्रात लिलाव सुरू होताच कांदादरात मोठी घसरण झाली. नवीन लाल कांद्याला कमीत कमी 700, सरासरी 1825, तर जास्तीत जास्त 2332 रुपये प्रतिक्विंटल दर मिळला. त्यामुळे राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष दिघोळे यांनी केंद्र सरकारने कांद्यावरील सध्या लागू केलेले २० टक्के निर्यातशुल्क तत्काळ रद्द करून शून्य टक्के करावे व कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा द्यावा, अशी मागणी करत घोषणाबाजी करत लिलावाला विरोध केला.

गेल्या महिन्याभरापासून कांदा दरातील घसरण सुरूच असून, सरासरी दर १४०० रुपयांपर्यंत खाली आल्याने दर सुधारण्यासाठी केंद्राने कांद्यावरील 20 टक्के निर्यातशुल्क हटविण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेने आक्रमक पवित्रा घेत सोमवारी दि.13 रोजी लासलगाव बाजार समितीत कांदा लिलाव बंद पाडले. खरीप हंगामात लाल कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर झाल्याने काही दिवसांपासून कांद्याचे दर प्रतिक्विंटल ३००० ते ३५०० रुपयांनी घसरले आहेत. यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. परिणामी, शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार