पुणे: जन आंदोलन ग्रुप पुणे यांच्यातर्फे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकरिता एक अधिकृत निवेदन धर्मयोद्धा डॉ. सुरेश चव्हाणके यांच्याकडे सादर करण्यात आले, जेणेकरून ही लोकहिताची मागणी केंद्र सरकारपर्यंत प्रभावीपणे पोहोचवता येईल. या निवेदन सादरीकरण प्रसंगी काही प्रतिनिधी उपस्थित होते.
सुदर्शन न्यूजची राष्ट्रीय भूमिका :
सुदर्शन न्यूज हा पहिला राष्ट्रीय वृत्तवाहिनी ठरला, ज्यांनी या जन आंदोलनाला प्राधान्य दिले.
या वृत्तवाहिनीद्वारे सदर विषयाचे प्रसारण करण्यात आले व ट्विटद्वारे सरकारचे लक्ष वेधण्यात आले.
डॉ. सुरेश चव्हाणके यांनी रेल्वेमंत्र्यांशी फोनवरून संवाद साधत ही मागणी गंभीरपणे सादर केली.
निवेदनातील मुख्य मुद्दे :
1. पुणे शहरात लाखो राजस्थानचे प्रवासी वास्तव्यास आहेत.
2. आठवड्यात केवळ काही दिवसच ट्रेन उपलब्ध असल्याने प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागतो.
3. व्यवसाय, शिक्षण, वैद्यकीय सेवा व कौटुंबिक प्रवासासाठी दररोज ट्रेन सेवा अत्यंत आवश्यक आहे.
4. सीट्सची संख्या व फेऱ्यांमध्ये वाढ करणे गरजेचे आहे.
जन आंदोलन ग्रुप पुणे यांनी सुरू केलेली ही चळवळ आता राष्ट्रीय जनहिताचा विषय ठरलेली आहे. सुदर्शन न्यूज व डॉ. सुरेश चव्हाणके यांच्या सहकार्यामुळे ही मागणी देशाच्या उच्च स्तरावर पोहोचली आहे.