सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

उरण येथे हिंदू तरुणीची जिहादी दाऊद शेखकडून निर्घृण हत्‍या; लव्ह जिहादचा अजून एक बळी

नवी मुंबईतील अक्षता म्हात्रे हिच्यावर अत्याचार करून तिची हत्या घडल्याची घटना ताजी असतांनाच नुकतेच उरणमध्ये एका २२ वर्षीय हिंदू मुलीची जिहादी दाऊद शेखकडून निर्घृण हत्या करण्यात आली आहे.

Sudarshan MH
  • Jul 28 2024 8:00AM

उरण: रायगड जिल्ह्यातील उरण येथील २२ वर्षीय यशश्री शिंदे हिची जिहादी दाऊद शेख या मुस्लिम प्रियकराने निर्घृण हत्या केली आहे. उरण शहरात एन. आय हायस्कूलच्या जवळ राहणारी यशश्री सुरेंद्र शिंदे वय २२ ही गुरुवार दिनांक २५ जुलै रोजी सकाळी घरातून निघाली व दुपारी दीड वाजेच्या सुमारास उरण बाजारपेठ येथे आढळून आली. मात्र त्या नंतर ती कुठेही दिसली नाही. त्यानंतर मुलगी हरवली किंवा बेपत्ता झाल्याचे लक्षात येताच तिच्या कुटुंबियांनी यशश्री शिंदे हरविली असल्याची तक्रार उरण पोलीस ठाण्यात नोंदविली. तिचा शोध सुरु होता, मात्र ती कुठेही सापडली नाही.

शुक्रवार दि. २६ जुलै रोजी रात्री उरण तालुक्यातील कोटनाका येथील पेट्रोल पंपाजवळ एका तरुणीचे मृतावस्थेत शरीर आढळले. तिचा छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला होता. उरण पोलिसांनी आरोपीचा शोध चालू केला असून तो बेंगळुरू येथे पळून गेल्याची माहिती आहे. या तरुणीचे स्तन आणि दोन्ही हात कापण्यात आले होते, तिच्या गुप्तांगावर वार करण्यात आले, तिच्या चेहर्‍यावर वार करून तो पूर्णपणे विद्रूप केला होता, चाकूने पोटावर पुष्कळ वार करण्यात आले असल्याची बाब पोस्मार्टम झाल्यानंतर उघडकीस आली. सदर घटना प्रेम प्रकरणातून घडली असल्याची प्राथमिक बाब समोर आली आहे.

या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील व त्यांचे सहकारी करत आहेत. उरणमध्ये लव्ह जिहादची अनेक प्रकरणे समोर येत असून या अशा प्रकरणांत पोलीस प्रशासनाने त्वरित कारवाई करून आरोपीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जनतेने केली आहे. यशश्री शिंदेच्या बाबतीत घडलेली घटना अंत्यत निर्दयी, क्रूर व निंदनीय व  मानव जातील काळिमा फासणारी घटना असल्याने सदर दोषी आरोपीला त्वरित फाशी व्हावी, अशी मागणी यशश्रीच्या कुटुंबियांनी व संतप्त झालेल्या नागरिकांनी केली आहे.

या निंदनीय कृत्याचे व्हाट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आदी सोशल मीडियावर पडसाद उमटले असून सोशल मीडियावर नागरिकांनी मोठया प्रमाणात निषेध व्यक्त केला आहे. तर उरण मधील व्यापारांनी आपली दुकाने बंद ठेवून निषेध व्यक्त केला आहे. दिवसेंदिवस लव्ह जिहादमुळे कित्येक हिंदू तरुणींचा जीव जात आहे. परंतु यावर राज्यसरकार लव्ह जिहाद थांबवण्यासाठी, धर्मांतर थांबवण्यासाठी प्रतिबंधात्मक कायदे कधी आणणार आहे? असा प्रश्न सकल हिंदू समाजाच्या मनात निर्माण झालेला आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार