सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

पुण्यातील भोसरी मधून श्री आदिशक्ती मुक्ताबाई पालखी रथ पंढरपूरकडे मार्गस्थ

पुण्यातून हजारो वारकरी विठ्ठल नामाच्या गजरात, टाळ - मृदंगाच्या गजरात, अभंग, हरिपाठ गात पंढरपूरकडे निघाले आहे.

Shruti Patil
  • Jun 30 2024 8:22AM

पुणे: महाराष्ट्रात असंख्य प्रथा आहेत पण ही 'पंढरीची वारी' म्हणजे प्रथा नाही तर आपल्या विठ्ठलाप्रती मनोभावे केलेली उपासना आहे. जी अखंड आणि अभंग सुरू आहे. वारीची परंपरा ही ८०० वर्षांपेक्षाही अधिक जुनी आहे. आज पुण्यातील भोसरी येथून श्री आदिशक्ती मुक्ताबाई पालखी रथ पंढरपूरकडे मार्गस्थ झाला आहे.

हजारो वारकरी विठ्ठल नामाच्या गजरात, टाळ - मृदंगाच्या गजरात, अभंग, हरिपाठ गात पंढरपूरकडे निघाले आहे. मुख्य पालखी रथामागे व रथाच्या पुढे वेगवेगळ्या गावांमधून आलेल्या पालख्या दिंडी क्रमांक प्रमाणे निघाल्या आहेत. अत्यंत प्रसन्न भक्तीमय वातावरणात पुणेकरांनी पालख्या बघण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूने गर्दी केली आहे.

महाराष्ट्रातील विविध गावांमधून तसंच अगदी कानाकोपऱ्यातून लाखो भाविक विठ्ठलनामाचा गजर करत ही परंपरा आजही जपत आहेत. आषाढ आणि कार्तिक या दोन्ही एकादशीला ही वारी होते पण आषाढी एकादशीची वारी ही खूपच मोठी आणि महत्त्वाची असल्याचे सांगितले जाते.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार