सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

बीएसएफ जवानांची बस कोसळली दरीत; तीन हुतात्मा

अपघातस्थळी बचावकार्य सुरू करण्यात आले असून जखमींना खानसाहीब आणि बडगाम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Sudarshan MH
  • Sep 21 2024 8:22AM

BSF Bus Accident: जम्मू – काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यात बसचा एक मोठा अपघात झाला आहे. सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली. या अपघातात तीन जवान हुतात्मा झाले आहे. बस कोसळल्याचे पाहताच स्थानिक लोक मदतीसाठी धावले. पोलीस देखील घटनास्थळी पोहोचले असून अपघाताचा तपास सुरू आहे. जवळपास २४ जवान जखमी झाले आहे.

अपघाताचे वृत्त कळताच स्थानिक लोक तातडीने मदतीसाठी धावले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार बसमध्ये 36 जवान होते. रस्त्यावरून बस घसरली आणि खाली कोसळली. जखमी जवानांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहेत. घटनास्थळी पोलीस पोहोचले असून ते तपास करत आहेत. 

अपघातस्थळी बचावकार्य सुरू करण्यात आले असून जखमींना खानसाहीब आणि बडगाम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही बस दक्षिण काश्मीरमधील पुलवामा येथून दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी बडगामकडे येत असताना हा अपघात झाला. बसमधील ३५ जवानांपैकी सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. ही बस खान साहिब वाटरहॉल पोलीस चौकीवर जात होती. साधारणपणे ५ वाजण्याच्या सुमारास पोलीस चौकीपासून केवळ ६०० मीटर दूर असतानाच हा अपघात झाला.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार