सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को सहयोग करे

Donation

अखेर केजरीवालांना कथित मद्य घोटाळाप्रकरणी जामीन मंजूर

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्लीतील राऊज ऍव्हेन्यू न्यायालयाने दिलासा दिला आहे.

Shruti Patil
  • Jun 21 2024 8:58AM

नवी दिल्ली: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्लीतील राऊज ऍव्हेन्यू न्यायालयाने दिलासा दिला आहे. कथित मद्य घोटाळ्याप्रकरणाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यांच्या जामिनाला स्थगिती देण्याची ईडीची याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे. केजरीवाल यांची आणि २१ जून तिहारमधून सुटका होणार आहे. कारणावरून केजरीवाल यांनी जामिनात वाढ करून देण्याची मागणी केली होती. मात्र, त्यांची ही विनंती फेटाळण्यात येऊन २ जून रोजी त्यांना सरेंडर करण्याचे आदेश देण्यात आले होते. तेव्हापासून ते तिहार तुरुंगातच होते.

यानंतर पुन्हा त्यांनी राउज एवेन्यू न्यायालयांत जामिनासाठी याचिका दाखल केली होती. त्यावरील सुनावणी दरम्यान गुरुवारी त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. विशेष न्या. न्याय बिंदू यांच्या खंडपीठाने केजरीवाल यांना एक लाखांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर केला. केजरीवालांना जामीन मंजूर झाल्यानंतर या आदेशाला वरच्या न्यायालयात आव्हान देता यावे यासाठी ईडीने बेल बॉण्डवर सही करण्यासाठी ४८ तासांची वेळ मागितली होती. मात्र, या आदेशाला स्थगिती दिली जाणार नाही, असे न्यायालयाने सांगितले.

 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार