अकोला: अकोल्यात ईदनिमित्त काढलेल्या जुलुसामध्ये सहभागी झालेल्या काही जिहाद्यांच्या हातात ‘हमास’ या आतंकवादी संघटनेचा अबू उबेदा याचे ‘द रियल हिरो, लायन’ असा मजकूर असलेले मोठे चित्र होते. एका ठिकाणी अल्जेरियन हमजा बेंडेलादाज याचेही चित्र होते. त्याच्यावर अमेरिकेतील २१७ बँका आणि वित्तीय संस्था यांच्यातील खासगी खाती हॅक करून लाखो यूएस् डॉलर चोरल्याचा आरोप आहे. या जुलुसामध्ये पोलीस बंदोबस्तही मोठ्या प्रमाणात होता.