सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

यशश्री शिंदे हत्या प्रकरणी उरणच्या जनतेचा निषेध मोर्चा

उरणमध्ये महिलांवरील अत्याचार, बलात्कार असे प्रकार थांबवावे, या प्रमुख मागणीसाठी उरणमध्ये निषेध मोर्चा काढण्यात आला.

Sudarshan MH
  • Jul 29 2024 7:50AM
रायगड: उरण मधील कोटनाका येथील पेट्रोल पंप येथे यशश्री शिंदे या हिंदू मुलीवर दाऊद शेख या जिहाद्याने धार धार शस्त्राने वार करून तिची निर्घुण हत्त्या केली. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली.अतिशय क्रूरपणे शरीरावर धारदार शस्त्राने वार करून तिची हत्या करण्यात आल्याने संपूर्ण उरण मध्ये हळहळ व्यक्त करण्यात आली. मात्र आरोपीला पकडण्यात पोलीस प्रश्यासनाला अपयश आल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे.
 
आरोपी सापडले नसल्याने नागरिकांमध्ये उद्रेक झाला. सर्वच राजकीय पक्षांनी, विविध सामाजिक संस्था संघटनानी निषेध करण्यासाठी उरणमध्ये एकत्र येण्याचे आवाहन केले होते. संशयित आरोपी दाऊद शेख याला त्वरित अटक करून फाशीची शिक्षा द्यावी. उरणमध्ये महिलांवरील अत्याचार, बलात्कार असे प्रकार थांबवावे, या प्रमुख मागणीसाठी उरणमध्ये निषेध मोर्चा काढण्यात आला.
 
सदर मोर्चा उरण शहरातील गांधी पुतळा ते राजपाल नाका, चारफाटा, चारफाटा ते परत राजपाल नाका मार्गे उरण पोलीस स्टेशन अशा मार्गाने काढण्यात आला. यावेळी उरणच्या व्यापारांनी कडकडीत बंद पाळून यशश्री शिंदेच्या हत्तेचा निषेध केला. संतप्त झालेल्या मोर्चेकरांनी उरण पोलीस स्टेशनला घेराव घातला होता.त्या वेळी आरोपीला लवकरात लवकर पकडून कडक शिक्षा देण्याचे आव्हान वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र कोते यांनी केले आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार