सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

सावरकरांबाबत अशा टिप्पण्या करू नका, अन्यथा न्यायालय स्वतःची दखल घेईल; सर्वोच्च न्यायालयाने दिला राहुल गांधींना इशारा

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याबद्दल राहुल गांधी यांनी माफीवीर अशी टिप्पणी केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे.

Sudarshan MH
  • Apr 26 2025 7:31AM

नवी दिल्ली: स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांना फटकारले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासारख्या लोकांनी आपल्याला स्वातंत्र्य दिले आणि तुम्ही त्यांच्याबाबत असे वागत आहात! भविष्यात कधीही अशा प्रकारच्या टिप्पण्या करू नका, अन्यथा न्यायालय स्वतःहून त्याची दखल घेऊ शकते, असा इशाराही न्यायालयाने राहुल गांधी यांना दिला आहे.

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याबद्दल राहुल गांधी यांनी माफीवीर अशी टिप्पणी केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे. स्वातंत्र्य सैनिकांची चेष्टा करू नका, असे सुनावतांनाच खंडपीठाने राहुल गांधी यांचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांना विचारले, की महात्मा गांधी यांनीही ब्रिटिशांशी संवाद साधतांना स्वतःसाठी तुमचा विश्वासू सेवक या शब्दांचा वापर केला होता, हे राहुल गांधी यांना माहीत आहे का? राहुल गांधी यांनी वीर सावरकर यांच्याबद्दल केलेले विधान बेजबाबदार होते. त्यांनी हे बोलायला नको होते, असे मत न्यायालयाने व्यक्त केले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार