सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्टच्या कोषाध्यक्षपदाचा कार्यभार आचार्य पवन त्रिपाठीकडे

मुंबई भाजपचे उपाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी यांनी श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्टच्या कोषाध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला.

Sudarshan MH
  • Oct 3 2024 7:50PM
मुंबई: मुंबई भाजपचे उपाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी यांनी श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्टच्या कोषाध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला. यावेळी त्यांनी कुटुंबासह श्री सिद्धिविनायक गणपतीचे दर्शन घेतले. सोबत महेश मुदलियार, जितेंद्र राऊत, भास्कर विचारे, सुदर्शन सांगळे, गोपाळ दळवी, भास्कर शेट्टी, मीना कांबळे, राहुल लोंढे, मनीषा तुपे या सर्व विश्वस्तांनीही पदभार स्वीकारला.
 
श्री सिद्धिविनायक गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर पवन त्रिपाठी म्हणाले की, भगवान श्री सिद्धिविनायक गणपती आणि गणेशभक्तांची सेवा करणे हे माझे परम आणि आद्य कर्तव्य आहे. ते म्हणाले की, श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर हे जगातील श्रद्धेचे मोठे केंद्र तसेच मानवतेचे मोठे केंद्र आहे. सिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्टतर्फे गरजूंना मदत केली जाते. जास्तीत जास्त गरजू लोकांना याचा लाभ घेता यावा यासाठी मी प्रयत्नशील राहीन.
 
यावेळी पवन त्रिपाठी यांना संन्यास आश्रमाचे प्रमुख पीठाधीश्वर स्वामी विश्वेश्वरानंद, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार, भाजपचे राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, ट्रस्टचे अध्यक्ष सदा सरवणकर, भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रेम शुक्ला, माजी खासदार गोपाल शेट्टी, आमदार प्रसाद लाड, राजहंस सिंह, भाजप नेते मोहित कंबोज, अमरजीत सिंग, ब्रह्मदेव तिवारी, आर.यू.सिंग, ओमप्रकाश चौहान, भाजप उत्तर भारतीय मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष संजय पांडे, सचिव विजय सिंह, मुंबई उत्तर भारतीय मोर्चाचे अध्यक्ष जयप्रकाश सिंह, जिल्हाध्यक्ष राजेश शिवडकर, डॉ. सुषम सावंत, शरद चिंतनकर, भालचंद्र शिरसाट, मुंबई भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष तेजिंदरसिंग तिवाना, पंकज यादव, आरडी यादव, ज्ञानमूर्ती शर्मा, रमाकांत गुप्ता, संतोष पांडे, दीपक सिंग, मुंबई भाजपा सचिव प्रमोद मिश्रा, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुरेंद्र सिंह, लोकगीत गायक सुरेश शुक्ला, भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते, मित्र, हितचिंतक, आणि उपस्थितांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार